शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर सेलचा धमाका; 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 13:27 IST

स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर मोठ्याप्रमाणात सवलत

नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीझन सुरु झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइट्वर आकर्षक सेलची धूमाकूळ सुरू असते. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक प्रोडक्ट्स बेस्ट डीलमध्ये उपलब्ध करण्यात येत आहेत. जर तुम्ही सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अशा  सेलची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

29 सप्टेंबरपासून अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची सुरुवात होत आहे. या सेलमध्ये तुम्हाला बेस्ट स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर मोठ्याप्रमाणात सवलत मिळणार आहे.  

सॅमसंगअ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये Samsung Galaxy M30 हा स्मार्टफोन 11,000 रुपयांऐवजी 9,999 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. तर  Galaxy नोट 9 सेलमध्ये डिस्काउंटनंतर  42,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच, सध्याच लाँच झालेला Galaxy M30s स्मार्टफोन ग्राहक या सेलमध्ये 1000 रुपयांच्या अॅमेझॉन कॅशबॅक ऑफरमध्ये खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये ग्राहकांना Galaxy M30s आणि M20 स्मार्टफोन आकर्षक सवलतीच्या दरात मिळणार आहेत. सेलमध्ये M10 ची किंमत 9,290 रुपयांवरुन कमी करण्यात आली असून 7,999 रुपये आणि  M20 ची किंमत 11,290 रुपयांवरुन 9,999 करण्यात आली आहे. जर, ग्राहक Galaxy नोट 10 खरेदी करण्याचा विचार करत असतील तर एक्सचेंज ऑफरमध्ये 6000 रुपयांपर्यंत डिस्काउंड मिळू शकेल.  

आसुसफ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट असलेला Asus 6Z स्मार्टफोन 31,999 रुपयांऐवजी 27,999 रुपयांना मिळू शकतो. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा स्मार्टफोन 35,999 रुपयांना मिळणार आहे. इतर दिवशी या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये असते.      

शाओमीफ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये Redmi Note 7 Pro स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यानंतर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. तर रेडमी K20 स्मार्टफोन 22,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांना मिळणार आहे. जर ग्राहक सेलमध्ये Redmi K20 Pro खरेदी करणार असतील तर चार हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्यामुळे हा स्मार्टफोन 24,999  रुपयांना मिळू शकतो.

वनप्लसअ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रो स्मार्टफोन डिस्काउंटवर मिळणार आहे. सेलमध्ये वनप्लस 7 स्मार्टफोनवर 3,000 रुपये आणि वनप्लस 7 प्रो स्मार्टफोनवर  4,000 रुपयांची सूट मिळणार आहे. ही सूट स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटवर मिळणार आहे. हाय-एंड व्हेरियंटवर या सेलमध्ये काय डील मिळणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 

अ‍ॅपलया दोन्ही सेलमध्ये अ‍ॅपल आयफोन संबंधी ऑफर्स किंवा डिस्काउंट काय देण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिली नाही. दरम्यान, फ्लिपकार्टने आयफोन्स कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा एकप्रकारे इशारा दिल्याचे समजते.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्टMobileमोबाइलsaleविक्री