शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि होम अप्लायन्सवर देखील मिळणार भरघोस सूट; Amazon च्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ ची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:24 IST

Amazon Great Indian Festival Sale Offers: Amazon India ने आपल्या आगामी Great Indian Festival Sale ची घोषणा केली आहे.  

Amazon India ने आपल्या आगामी फेस्टिव्ह सीजन सेलची घोषणा केली आहे. कंपनीच्या आगामी Great Indian Festival Sale ची माहिती एका मायक्रोसाईटच्या माध्यमातून समोर आली आहे. या पेजवर कंपनीने आपल्या आगामी सेलमधील बँक ऑफर्स आणि डील्सची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे नुकतीच फ्लिपकार्टने आपल्या Flipkart Big Bilion Days Sale ची घोषणा केली होती.  

दरवर्षी ई-कॉमर्स वेबसाईट नवरात्री, दिवाळी दरम्यान फेस्टिव्ह सीजन सेलचे आयोजन करतात. यावर्षी देखील फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने आपल्या फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. यावर्षी देखील इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स, फॅशन अ‍ॅक्सेसरीज, घरगुती उपकरणे इत्यादींवर या सेलमध्ये भरघोस सूट देण्यात येईल.  

Amazon Great Indian Festival Sale 

अ‍ॅमेझॉनवर आयोजित आगामी सेलमध्ये HDFC बँक कार्डने खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, अ‍ॅक्सेसरीज, कम्प्युटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर ही ऑफर दिली जाणार आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट दोन्हींवर ही ऑफर लागू होईल. तसेच Amazon Prime मेंबर्सना या सेलचा फायदा 24 तास आधीच घेता येईल.  

ICICI बँकेच्या कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 5 टक्के रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. तसेच या सेलमध्ये प्रोडक्ट्स विकत घेतल्यास 25,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर देखील मिळतील. अ‍ॅमेझॉन कुपन्सच्या माध्यमातून 20 लाखांपेक्षा जास्त प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळेल. मोबाईल आणि अ‍ॅक्सेसरीज खरेदी केल्यास कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट EMI आणि फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट सारख्या ऑफर्सचा लाभ देखील घेता येईल. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन