शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

अल्काटेल ए5 एलईडी, ए7 : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: November 10, 2017 9:59 AM

अल्काटेल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी ए५ एलईडी आणि ए७ हे दोन स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली असून हे दोन्ही मॉडेल अमेझॉनवरून उपलब्ध करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअल्काटेल ए5 एलईडी हा स्मार्टफोन या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला होता.अल्काटेल ए7 या मॉडेलचं आयएफए-2017मध्ये अनावरण करण्यात आलं.दोन्ही स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे 12 हजार 999 आणि 13 हजार 999 रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत.

अल्काटेल ए5 एलईडी हा स्मार्टफोन या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला होता. तर अल्काटेल ए7 या मॉडेलचं आयएफए-2017मध्ये अनावरण करण्यात आलं. हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे 12 हजार 999 आणि 13 हजार 999 रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील अल्काटेल ए5 एलईडी हा स्मार्टफोन मॉड्युलर या प्रकारातील आहे. अर्थात यात युजर हव्या त्या पध्दतीने बदल करू शकतो. याच्या मागील बाजूच्या कव्हरवर अतिशय आकर्षक असं एलईडी लाईट्स लावण्यात आले आहेत. नोटिफिकेशन्स आल्यावर हे लाईट रंग बदलतात. हे कव्हर बदलून वापरण्याची सुविधा युजरला प्रदान करण्यात आली आहे. यासाठी लाईटअप मॉड प्लस आणि स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून युजरला कस्टमायझेशनची सुविधा देण्यात आली आहे. यात 5.2 इंच आकारमानाचा आणि 1280 बाय 720 पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी 6763 प्रोसेसरने सज्ज असेल. याची रॅम 3 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. 

यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सल्सचा असून यात ड्युअल टोन एलईडी फ्लॅश आणि एफ/2.0 अपार्चर असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात फिक्स्ड फोकस आणि एलईडी फ्लॅशयुक्त 5 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यातील बॅटरी 3100 मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा असेल.

अल्काटेल ए7 या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा (1920 बाय 1080 पिक्सल्स) डिस्प्ले असेल. याची रॅम 4 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 32 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात ड्युअल टोन एलईडी फ्लॅशसह मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील बॅटरी 4,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हा स्मार्टफोनही अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे.

अल्काटेल ए5 एलईडी व ए4 हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे 12 हजार 999 आणि तेरा हजार 999 रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील अल्काटेल ए5 एलईडी या स्मार्टफोनला संलग्न करण्यास सक्षम असणारा लाईटअप मॉड प्लसचे मूल्य 3 हजार 999 रूपये आहे. मात्र प्रारंभी ग्राहकांना हे मॉड मोफत देण्यात येत आहे. तर अल्काटेल ए7 या स्मार्टफोनसह प्रारंभी 2 हजार 499 रूपये मूल्य असणारा टिसीएल मुव्हबँड मोफत देण्यात येत आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल