शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अक्षय कुमारचा FAU G लाँच झाला; असा करा मोबाईलमध्ये डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 13:21 IST

FAU G game launched : अक्षय कुमारने हा गेम डाऊनलोड करण्याची लिंक शेअर केली आहे. सोबत ट्विटरवर या गेमशी संबंधित एक नवीन व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

चिनी पब्जी गेमला भारतात बंदी घातल्यानंतर पब्जी प्रेमींनी व्हीपीएनचा मार्ग निवडला आहे. याद्वारे लपूनछपून पब्जी गेम खेळण्याची मजा घेतली जात आहे. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारचा FAU G (Fearless and United Guards) लाँच झाला आहे. 

खरेतर हा अक्षय कुमारचा गेम नसून तो स्टुडिओ nCore गेमिंग नावाच्या कंपनीने बनविलेला गेम आहे. हा गेम अभिनेता अक्षय कुमार प्रमोट करत असल्याने अनेकांना तो त्याचाच गेम वाटू लागला आहे. हा गेम गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाला असून डाऊनलोड करता येणार आहे. हा 460 एमबीचा गेम आहे. या गेमला प्ले स्टोअरवर 4.5 स्टार मिळाले असून 48k रिव्ह्यूज आले आहेत. 

FAU-G ची घोषणा झाल्यापासून या गेमची तरुणांमध्ये खूप उत्सुकता असून, याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. FAU-G गेमच्या दमदार ट्रेलरमुळे याविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये गेमची घोषणा करण्यात आल्यानंतर प्री-रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झाली होती. पहिल्या २४ तासांत १० लाख जणांनी नोंदणी केली होती. बेंगळुरू येथील nCORE Games डेव्हलपर्स FAU-G गेमची निर्मिती केली आहे. 

अक्षय कुमारने हा गेम डाऊनलोड करण्याची लिंक शेअर केली आहे. सोबत ट्विटरवर या गेमशी संबंधित एक नवीन व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा गेम आधीच लाँच होणार होता, मात्र प्रजासत्ताक दिनासाठी तो पुढे ढकलण्यात आला होता. सध्या हा गेम केवळ अँड्रॉईड मोबाईलवरच खेळता येणार आहे. कालांतराने तो आयफोनवरही उपलब्ध होणार आहे. 

या मोबाईल गेममध्ये इन अॅप परचेसचा पर्यायही आहे. हा गेम मोफतही डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, पब्जीसारखेच इन अॅप परचेसही देण्य़ात आले आहे. गेमच्या आत खरेदी करून तुम्ही लेव्हलही वाढवू शकणार आहात. हा गेम डाऊनलोड करण्यासाठी गुगलच्या प्लेस्टोअरवर जावे लागणार आहे. तिथे FAUGटाईप करावे लागेलय जर तुम्ही आधीच प्री रजिस्ट्रेशन केले असेल तर इथून किंवा वेबसाईवरून डाऊनलोड करू शकता. 

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारPUBG Gameपबजी गेम