शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

एअरटेलची धमाकेदार ऑफर, 448 रुपयांत देणार 70 जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 17:25 IST

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणले आहेत. एअरटेल कंपनीकडून प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी हे प्लॅन आहेत. सध्या मोबाइल मार्केटिंगमध्ये चर्चेत असलेल्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने हे प्लॅन लाँच केल्याचे दिसून येते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने आपले काही प्लॅन महाग ...

ठळक मुद्देएअरटेलची धमाकेदार ऑफर,499 रुपयांमध्ये पोस्टपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि नॅशनल रोमिंग 448 रुपयांत प्रीपेड ग्राहकांसाठी देणार 70 जीबी डेटा

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणले आहेत. एअरटेल कंपनीकडून प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी हे प्लॅन आहेत. सध्या मोबाइल मार्केटिंगमध्ये चर्चेत असलेल्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने हे प्लॅन लाँच केल्याचे दिसून येते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने आपले काही प्लॅन महाग केले आहेत, त्यामुळे रिलायन्स जिओचे ग्राहक आपल्याकडे वळविण्यास एअरटेल कंपनीला या प्लॅनचा फायदा होणार आहे.  एअरटेलने Infinity Postpaid च्या माध्यमातून मार्केटमध्ये हा प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. या प्लॅनची सुरुवात 499 रुपयांपासून आहे. यामध्ये इंटरनेट डेटा आणि कॉलिंगसह डिजिटल कॉन्टेंट आणि डिव्हाईस प्रोटेक्शन सुद्धा देण्यात आले आहे. त्यामुळे एअरटेलचा विशेष प्लॅन असल्याचे सांगण्यात येते. 499 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि नॅशनल रोमिंग मिळणार आहे. याशिवाय एसटीडी कॉलिंग सुद्धा पूर्णपणे फ्री आहे. त्याचबरोबर इंटरनेट डेटाच्या बाबतीत पाहिले, तर कंपनीकडून ग्राहकांना 20 जीबी 4जी/3जी डेटा देण्यात येत आहे. सरासरी बघितले, तर इतर मोबाईल कंपन्यांच्या तुलनेत एअरटेल 10 ते 15 जीबी डेटा जास्त देत आहे. डेटा आणि कॉलिंग शिवाय प्लॅनमध्ये दुसरी खाशियत म्हणजे डिव्हाईस प्रोटेक्शन सेवा दिली आहे. याचबरोबर 'एअरटेल सिक्युअर' डिव्हाईस प्रोटेक्शन देण्याचा दावा सुद्धा कंपनीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, एअरटेलने फक्त पोस्टपेड ग्राहकांसाठी प्लॅन लाँच केला नाही, तर प्रीपेड ग्राहकांसाठी सुद्धा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 448 रुपयांचा असून यामध्ये फ्री अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा देण्यात आली आहे. तसेच 70 जीबी इंटरनेट डेटा देण्यात आला आहे. दरम्यान, डेटा अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांनी एअरटेलच्या माय अॅपचा वापर करु शकतात.  

टॅग्स :Airtelएअरटेल