शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Airtel ग्राहकांना मिळणार Amazon Prime आणि Netflixचं फ्री सब्सक्रिप्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:20 IST

#AirtelThanks नुसार कंपनी आपल्या पार्टनर्ससोबत ग्राहकांना ऑफर्स देणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय टेलीकॉम कंपनी एअरटेलने #AirtelThanks कस्टमर प्रोग्रामला पुन्हा एकदा लॉन्च केले आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून एअरटेल आपल्या ग्राहकांना रिवॉर्ड देत आहे. यामध्ये सिल्वर, गोल्ड आणि प्लेटिनम असे तीन टप्पे आहेत. ग्राहकांना याचे वेगवेगळे फायदे मिळणार आहेत. 

#AirtelThanks नुसार कंपनी आपल्या पार्टनर्ससोबत ग्राहकांना ऑफर्स देणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही एअरटेलचा वापर करत असाला तर तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, Zee5 आणि Wynk Music याचे सब्सक्रिप्शन मिळू शकते. एअरटेलच्या माहिनुसार, ग्राहकांसाठी कस्टमाइज्ड ऑफर्स असणार आहेत. AirtelThanks नुसार ग्राहकांना डिव्हाईस सिक्युरिटी आणि व्हिआयपी कॉनेट्सपासून सरप्राईज ऑफर्स मिळणार आहेत. 

Silver Tier बेसिक कॉन्टेंट सर्व्हिससाठी आहे. यामध्ये ग्राहकांना Airtel TV, Wynk सब्सक्रिप्शन मिळणार आहे. गोल्डमध्ये ग्राहकांना अ‍ॅड ऑन टेलिकॉम बेनिफिट्स आणि प्रीमियम कॉन्टेंटचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. तर प्लेटिनममध्ये ग्राहकांना एअरटेलकडून VIP सर्व्हिस मिळणार आहे. तसेच, प्रिमियम कॉन्टेंट, ई-बुक, डिव्हाईस प्रोटेक्सन आणि सेल्समध्ये प्रायॉरिटी अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे. भारती एअरटेलचे चीफ प्रोडक्ट अधिकारी आदर्श नायर यांनी सांगितले, 'AirtelThanks ला टेक्नॉलॉजी आणि अनेक पार्टनर्शिप्ससोबत मिळून तयार केले आहे. ग्राहकांना गरजेपेक्षा अधिक चांगला अनुभव मिळेल. आम्ही डेटा सायन्स, मशिन लर्निंग आणि स्मार्ट API मध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे अ‍ॅमेझॉन यासारख्या डिजिटल फर्स्ट ब्रांडसोबत मिळून असे अनुभव घेऊ.'

Amazon Prime सब्सक्रिप्शन फ्रीएअरटेल प्रीपेड ग्राहकांना सुद्धा कंपनी अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देत आहे. Airtel Thanks नुसार कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना नवी ऑफर घेऊन आली आहे. 299 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये 28 दिवसांची मर्यादा आहे. तसेच, यामध्ये अॅमेझॉन प्राईमची फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. याशिवाय, दररोज 2.5 जीबी डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच, अ‍ॅमेझॉन प्राईम म्युजिक सुद्धा फ्री मिळणार आहे.  

एअरटेलने अ‍ॅपला रिनेम करुन Airtel Thanks केला आहे. दरम्यान, ग्राहकांना Airtel Thanks डाऊनलोड केल्यानंतरच या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.  

टॅग्स :AirtelएअरटेलMobileमोबाइलamazonअ‍ॅमेझॉन