Airtel घेणार TCS ची मदत; देशात ‘Made In india’ 5G आणण्यासाठी केली भागेदारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:53 PM2021-06-21T18:53:12+5:302021-06-21T18:54:32+5:30

Airtel joins hand with TCS: देशात ‘मेड इन इंडिया’ 5G आणण्यासाठी एयरटेलने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सोबत भागेदारी केली आहे.  

Airtel and tata group announce collaboration to build made in india 5g  | Airtel घेणार TCS ची मदत; देशात ‘Made In india’ 5G आणण्यासाठी केली भागेदारी 

Airtel घेणार TCS ची मदत; देशात ‘Made In india’ 5G आणण्यासाठी केली भागेदारी 

Next

भारतात 5जी नेटवर्क आणण्याची शर्यत सुरु झाली आहे, यात भारती एयरटेल आणि रिलायन्स जियो आघाडीवर दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एयरटेलने गुरुग्राममध्ये ट्रायल सुरु केले होते त्यातून 1Gbps चा स्पीड मिळाला होता. आता जियोला मागे टाकण्यासाठी कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत भागेदारी केली आहे. यामुळे एयरटेलला देखील जियोप्रमाणे ‘मेड इन इंडिया’ 5G नेटवर्क ग्राहकांना देता येईल.  

टाटा ग्रुपने एक ‘अत्याधुनिक’ ओ-आरएएन आधारित रेडियो आणि एनएसए/एसए कोर बनवला आहे आणि आपल्या पार्टनर्सच्या मदतीने या पूर्णपणे स्वदेशी दूरसंचार स्टॅकची जोडणी केली आहे. हि टेक्नॉलॉजी जानेवारी 2022 पासून व्यवसायिकरित्या वापरण्यासाठी उपलब्ध होईल. 

भारती एयरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टलचा यांनी म्हटले, ‘5जी आणि त्या संबंधित टेक्नॉलॉजीसाठी भारताला ग्लोबल हब बनवण्यासाठी आम्ही टाटा समूहासोबत मिळून काम करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी इकोसिस्टम आणि कौशल्याच्या जोरावर भारत जगाला मॉर्डन सोल्यूशन आणि अ‍ॅप्लीकेशन देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. यामुळे भारताला इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग डिस्टिनेशन बनण्यास मोठ्याप्रमाणावर मदत होईल.’  

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेज (TCS) आपल्या ग्लोबल सिस्टम इंटिग्रेशन मधील अनुभवासह 3GPP आणि O-RAN दोन्ही स्टँडर्ड्ससाठी एन्ड -टू-एन्ड सोल्युशन देण्यास मदत करते, कारण नेटवर्क आणि उपकरण वेगाने सॉफ्टवेयरमध्ये एम्बेड होतात. एयरटेल भारतात आपल्या 5G रोलआउटबाबत उत्साहित आहे आणि 2022 जानेवारीपर्यंत स्वदेशी 5G भारतात रोलआउट केले जाईल, अशी चर्चा आहे. एयरटेल भारत सरकारच्या नियमावलीचे पालन करत भारतात 5G रोलआउट करेल. 

Web Title: Airtel and tata group announce collaboration to build made in india 5g 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल