शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Airtel 5G: कधी होणार लॉन्च आणि किती असेल Airtel 5G प्लॅन्सची किंमत? महत्वाची माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 16:10 IST

Airtel 5G: भारतात 5G सेवा लॉन्च करण्यासाठी एअरटेलने आपली तयारी पूर्ण केली आहे.

भारतातील नागरिकांना 5G साठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. देशात लवकरच 5G सेवा सुरू होऊ शकते. देशातील दूरसंचार कंपनी एअरटेल(Airtel)ने दिलेल्या माहितीनुसार, 5G स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर 5G सेवा सुरू होतील. 91Mobiles च्या वृत्तानुसार, कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी रणदीप सेखॉन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. 

5G सेवा कधी सुरू होईलरणदीप सेखॉन म्हणाले की, कंपनी 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर 2 ते 3 महिन्यांत 5G सेवा सुरू करेल. गुरुवारी झालेल्या 5G नेटवर्क डेमो दरम्यान ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमात Airtel ने 5G ची झलक दाखवली. कंपनीने 5G वर व्हिडिओ अनुभव शेअर केला. हा डेमो सरकारने टेलिकॉम कंपन्यांना चाचणीसाठी दिलेल्या 3500MHz च्या बँडवर करण्यात आला होता. 

Airtel 5G ची किंमत किती असेलसेखॉन यांनी सांगितल्यानुसार, स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर एअरटेल 5G लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार असेल. एअरटेल 5G च्या किमतीबाबत बोलताना ते म्हणाले की, भारतातील 5G ​​प्लॅनची ​​किंमत 4G प्लॅन्स सारखीच असेल. एअरटेलने गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या 5G नेटवर्क स्पीडचा डेमोही दाखवला.

एअरटेलच्या 5जीचा स्पीड कितीकंपनीने 1983 च्या विश्वचषकात कपिल देव यांच्या खेळीचा व्हिडिओ प्ले केला होता. एअरटेलने 50 कॉनकरंट युझर्ससोबत 4K व्हिडिओ प्ले केला, ज्यामध्ये युझर्सना 200mbps ची स्पीड मिळत होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एअरटेलने हैदराबादमध्ये 5G नेटवर्कचा डेमो दाखवला होता. कंपनीने जूनमध्ये गुरुग्राममध्ये 5G नेटवर्कची चाचणी घेतली होती, ज्यामध्ये 1Gbps स्पीड आढळून आला होता.  

टॅग्स :AirtelएअरटेलIdeaआयडियाVodafoneव्होडाफोनJioजिओ