शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

ब्राझीलचा Appleला मोठा झटका, 'या' कारणामुळे जप्त केले iphones

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 23:01 IST

Appleला अनेक वेळा दंड केल्यानंतर, या देशाच्या सरकारने एक मोठे पाऊल पुढे उचलले आहे.

Apple ने 2020 पासून iPhones सोबत चार्जर देणे बंद केले आहे. या निर्णयामुळे ब्राझील सरकारसह जगभरातील अनेक लोक संतप्त झाले आहेत. यामुळे Appleला अनेक वेळा दंड केल्यानंतर, सरकारने आता एक मोठे पाऊल पुढे उचलले आहे. सरकारने Apple स्टोअर आणि रीसेलर्सकडून शेकडो iPhones जप्त केले आहेत. कंपनीला चार्जरशिवाय आयफोन विकण्यापासून रोखण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे. 

सरकारचा कंपनीच्या निर्णयावर अक्षेपसरकारने विविध अॅपल स्टोअर्स आणि रीसेलर्सकडून नवीन आयफोनची युनिट्स जप्त केल्याची माहिती आहे. हे आयफोन युनिट्स चार्जरशिवाय येतात. यावर 2020 मध्येच iPhone  12 लाँच झाल्यापासून ब्राझिलियन सरकारने आक्षेप घेतला आहे. स्थानिक अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, बॉक्समध्ये चार्जर न विकणे म्हणजे अॅपलचे उत्पादन अपूर्ण आहे. आयफोन चालवण्यासाठी चार्जर आवश्यक आहे. 

ब्राझिलियन स्टोअरमधून आयफोन जप्त9to5Mac च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ब्राझीलने ऑपरेशन डिस्चार्ज आंदोलनांतर्गत ही कारवाई केली आहे. दुसरीकडे अॅपलने ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना नवीन नियम जारी होईपर्यंत त्या युनिट्सची विक्री करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. अॅपलने युनिट्स विकण्याच्या परवानगीसाठी सरकारकडे अर्जही केला आहे. यापूर्वी अॅपलने बॉक्समध्ये चार्जिंग अॅडॉप्टर देण्याचे ठरले होते, पण तसे झाले नाही.

टॅग्स :Brazilब्राझीलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X