शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधारप्रमाणे प्रत्येक वाहनाला मिळणार विशिष्ट क्रमांक

By शेखर पाटील | Updated: September 8, 2017 13:07 IST

लवकरच आपल्या वाहनाला आधारप्रमाणे युनिक क्रमांक मिळणार असून याच्या माध्यमातून देशातील टोल नाक्यांवरील गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. आधारच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युनिक अशी ओळख मिळालेली आहे

ठळक मुद्देयामुळे संबंधीत वाहनचालकाला त्या टोल नाक्यावर थांबून टोल अदा करण्याची आवश्यकता उरणार नाहीतर आरएफआयडी टॅगच्या माध्यमातून त्या युजरच्या अकाऊंटमधून आपोआप टोलचे पैसे संबंधीत नाक्याच्या खात्यात जमा होतीलभविष्यात प्रत्येक नवीन वाहन विकत घेतांना हा टॅग लावलेला असेल

लवकरच आपल्या वाहनाला आधारप्रमाणे युनिक क्रमांक मिळणार असून याच्या माध्यमातून देशातील टोल नाक्यांवरील गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. आधारच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युनिक अशी ओळख मिळालेली आहे. याच प्रकारची ओळख आता देशातील प्रत्येक वाहनाला मिळू शकते. केंद्रीय दळणवळण मंत्रालय आणि नॅशनल हायवे ऑथेरिटी ऑफ इंडिया म्हणजेच न्हाईने काही दिवसांपूर्वीच फास्टॅग ही प्रणाली सुरू केली आहे. यासाठी दोन स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्सदेखील लाँच करण्यात आले आहेत. फास्टॅग हे रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेंटीफिकेशन या प्रणालीवर आधारित टॅग आहेत. देशभरात हे स्टीकरच्या स्वरूपातील टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. संबंधीत फास्टॅग स्टीकर हे वाहनाच्या विंडशिल्डवर लावलेले असेल. अशा प्रकारच्या वाहनांसाठी देशातील प्रत्येक टोल नाक्यावर स्वतंत्र लेन राखीव ठेवण्यात येणार आहे. यात संबंधीत आरएफआयडी टॅग रीड करणारी यंत्रणा लावण्यात आलेली असेल. सध्या आयसीआयसीआर, अ‍ॅक्सीस बँक आणि पेटीएमने या टॅगला कार्यान्वित करण्याची सुविधा दिलेली आहे. मात्र लवकरच अन्य बँका याला लागू करण्याची शक्यता आहे.

यामुळे संबंधीत वाहनचालकाला त्या टोल नाक्यावर थांबून टोल अदा करण्याची आवश्यकता उरणार नाही. तर आरएफआयडी टॅगच्या माध्यमातून त्या युजरच्या अकाऊंटमधून (जे त्याच्या बँक खात्याशी कनेक्ट केलेले असेल!) आपोआप टोलचे पैसे संबंधीत नाक्याच्या खात्यात जमा होतील. अर्थात एकाच वेळी कॅशलेस व्यवहार होत असतांना वाहनचालकाना थांबणे आणि त्यातून त्याच्या प्रवासाला होणार विलंब आणि अर्थातच त्या परिसरातील प्रदूषण, वाहतुकीची कोंडी या सर्व बाबींना आळा बसणार आहे. सध्या तरी कुणीही फास्टॅग आपल्या वाहनाला विकत घेऊन लाऊ शकतो. मात्र भविष्यात प्रत्येक नवीन वाहन विकत घेतांना हा टॅग लावलेला असेल. 

टॅग्स :AutomobileवाहनcarकारTravelप्रवास