शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

5G साठी 6 पट अधिक टॉवर, केबल लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :  ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला असला तरी ५ जी दूरसंचार सेवेसाठी ४ जी सेवेच्या तुलनेत ६ पट अधिक दूरसंचार टॉवर आणि फायबर-ऑप्टिक केबल लागतील, असे फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे कार्यकारी चेअरमन दीपक छाबरिया यांनी म्हटले आहे.

‘फिनोलेक्स केबल्स’ ही  भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी केबल उत्पादक कंपनी आहे. छाबरिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ५ जी दूरसंचार सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायची असेल, तर आताच्यापेक्षा ६ पट अधिक पायाभूत सुविधांची गरज लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दूरसंचार टॉवरपैकी केवळ ३० टक्के टाॅवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेले आहेत. उरलेले टॉवर ४ जी सेवेसाठी सूक्ष्म लहरींवर चालतात. मात्र ५ जी सेवेसाठी प्रत्येक टॉवर फायबर-ऑप्टिक केबलने जोडलेला असणे आवश्यक आहे. टॉवरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. 

छाबरिया यांनी सांगितले की, ४ जी सेवा ज्या सूक्ष्म लहरींवर चालते, त्या लहरी अखंडित ५ जी सेवेसाठी विश्वसनीय नाहीत. विशेषत: वातावरणीय बदलांत या लहरी टिकत नाहीत. शहरांमध्ये फायबर केबलने जाेडलेल्या टॉवरचा रिंग रोड लागेल. यातील आणखी एक आव्हान असे की, प्रत्येक इंटरसेक्शनसाठी वेगळ्या केबल संचाची गरज लागणार आहे. आपली कंपनी हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असल्याचेही छाबरिया यांनी म्हटले आहे.

५ जीमध्ये इंटरनेट स्पीड २० जीबीपीएस४ जी सेवेच्या इंटरनेटची गती २ जीबीपीएस आहे. ५ जीमध्ये ते २० जीबीपीएस असेल. ५ जी सेवेत टॉवरचा आकार घटेल. मात्र, अखंडित सेवा देण्यासाठी टॉवरची संख्या ६ पट अधिक लागेल. ५ जी इंटरनेट सेवेमुळे चालकरहित कारच्या पायाभूत विकासाचा मार्ग मोकळा होईल. त्याचा मोठा फायदा देशाला होईल.    - दीपक छाबरिया,     कार्यकारी चेअरमन, फिनोलेक्स     केबल्स लिमिटेड