शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी अध्यक्ष झालो, म्हणून झाडलोट करायला लाज कसली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 05:44 IST

मी माझा प्रपंच करत आलोय़ मी झेडपीचा अध्यक्ष झालो असलो तरी माझ्या प्रपंचासाठी गायी-म्हशीच्या धारा काढून झाडलोट करावीच लागणार आहे़

नासीर कबीर करमाळा : दुधाच्या रतिबातून जे पैसे मिळतात त्यातूनच मी माझा प्रपंच करत आलोय़ मी झेडपीचा अध्यक्ष झालो असलो तरी माझ्या प्रपंचासाठी गायी-म्हशीच्या धारा काढून झाडलोट करावीच लागणार आहे़ यात लाज वाटायचं कारणच नाही, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले.अनिरुद्ध ऊर्फ आण्णा कांबळे हे गरीब कुटुंबातील असून केम (ता़ करमाळा) गावापासून दीड किलोमीटर अंतरावर वडिलोपार्जित १५ एकर जिरायत जमीन आहे.ते म्हणाले, घरात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले आहेत़ एक मुलगा अकलूज येथे बारावीत तर दुसरा मुलगा केम येथे दहावीमध्ये शिकत आहे. कांबळेंची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ पाऊस पडला तर शेती पिकते अन्यथा दुष्काळास सामोरे जावे लागते़ त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला़ दररोज १० लिटर दूध केम गावात रतिबाने दिले जाते़ जे पैसे मिळतात त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करून गावात राजकारण व समाजकारण करीत असल्याचे त्यांनी सांगितले़अध्यक्ष झाल्याचा आनंदच़़़पाऊस पाण्याचं काही खरं नसल्यानं घरप्रपंच व मुलांचं शिक्षण करण्यासाठी दूध धंदा सुरू केला. १४ लहान-मोठ्या देशी, खिलार गाई गुजरातहून आणल्या. गाईगुरांची झाडलोट, धारा काढणे ही सर्व कामे तेच करतात. मी त्यांना मदत करते. गेल्या आठवड्यात मला त्यांनी सांगितलं की, मी झेडपी अध्यक्ष होणाराय़ तेव्हा मी विचारलं, अध्यक्ष म्हणजे काय? त्यांनी मला सांगितलं़ आठवड्यातून चार दिवस बाहेर काम करावं लागतं़ तेव्हा मी त्यांना म्हणाले, गायगुरांचं कसं होईल? ते अध्यक्ष झाल्यानंतर मला आनंदच झाल्याची भावना कांबळे यांच्या पत्नी शुभांगी यांनी व्यक्त केली़>कुटुंबातील सर्वांना बरोबर घेऊन आपण प्रपंच करतो़ त्याप्रमाणेच झेडपीचा कारभार आपण सर्वांना बरोबर घेऊन करणार आहे़ तसेच सदस्य असताना ज्याप्रमाणे घरची दैनंदिन कामे आपण करत होतो़, ती सर्व कामे यापुढेही करेन.- अनिरुद्ध कांबळे, अध्यक्ष, जि.प. सोलापूर