शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांस ठेकेदाराकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 11:51 IST

बिल काढत नसल्याचा राग : ठेकेदाराची कार्यालयात गुंडगिरी 

ठळक मुद्देहा प्रकार घडल्याने सदर बझार पोलिसात माहिती देण्यात आलीयाप्रकरणी सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बिल काढण्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीवरूनच हा प्रकार

 सोलापूर : शासकीय योजनेतून केलेल्या कामाच्या देयकाची रक्कम मिळावी, यासाठी पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने भीमा पवार या संतापलेल्या कंत्राटदाराने जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील वरिष्ठ सहायक (लेखा) अनिल बिराजदार यांना कार्यालयातच मारहाण केली. त्यानंतर कर्मचाºयांनी मिळून कंत्राटदाराला मारहाण केली. घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून, वित्त विभागातील कारभारही या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, या कंत्राटदाराने तीर्थक्षेत्र विकास निधीतून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ब्रह्मनाथ मंदिराच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम केले होते. या कामापोटी अडीच लाख रुपयांचे बिल त्याने बांधकाम विभागामार्फत दिले होते. देयकाचे बिल लवकर मिळावे, यासाठी कंत्राटदाराचा पाठपुरावा सुरू होता. बिलाच्या विचारणेसाठी कंत्राटदार पवार जिल्हा परिषदेत गेला असता हा प्रकार घडला.

वित्त विभागातील सहकारी कार्यालयीन कामात गुंतले असताना पवार याने कक्षात जाऊन बिराजदार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अकस्मातपणे त्यांच्या श्रीमुखात लगावली. अकस्मात घडलेल्या या प्रकारानंतर सहकाºयांनी धाव घेऊन बिराजदार यांची सुटका केली. त्यानंतर बिराजदारसह अन्य कर्मचाºयांनी भीमा पवारला मारहाण केली. या विभागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये हा सर्व प्रकार चित्रित झाला आहे.

या प्रकार घडला तेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आपल्या कक्षातच बसलेले होते. त्यांच्या कानावर हा प्रकार जाताच लेखा विभागातील अधिकाºयांना बोलावून घडलेला प्रकार जाणून घेतला. त्यांतर सीसीटीव्ही फुटेजवरूनही या घटनेची खातरजमा करून घेतली. या फुटेजमध्ये आधी कंत्राटदार बिराजदार यांना मारताना व नंतर बिराजदारसह अन्य सहकारी कंत्राटदाराला मारताना स्पष्ट दिसत आहेत.

कार्यालयातच हा प्रकार घडल्याने सदर बझार पोलिसात माहिती देण्यात आली. पोलीस पोहोचेपर्यंत भीमा पवार जिल्हा परिषदेतच होता. मात्र त्यानंतर पहिल्या मजल्यावरून समाजकल्याण विभागाच्या मागील बाजूने पायºया उतरून पसार झाला.  याप्रकरणी सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

देयकासाठी टोलवाटोलवी नित्याचीच- या प्रकरणी पोलीस ठेकेदार भीमा पवारचा शोध घेतला जात आहे. बिल काढण्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीवरूनच हा प्रकार हाणामारीपर्यंत पोहोचल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती. वारंवार विचारणा करूनही कंत्राटदारांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी चकरा मारायला लावतात. कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण सांगून बांधकाम विभाग ते वित्त विभाग अशी टोलवाटोलवी सातत्याने अनुभवास येत असल्याची प्रतिक्रियाही या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांमधून ऐकावयास येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद