शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे २२ फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:53 IST

पंढरपूर आषाढी वारी : सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्दे५८६ साक्षीदार आणि आरोपी यांना एका दिवसात समन्स वॉरंट२२ फरारी आरोपींना जेरबंद करुन संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले

सोलापूर : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या २२ फरारी आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

 उमिर नासिर नाईकवाडी, माणिक आण्णाप्पा जाधव, गोपू बाबू राठोड, शिवाजी किशोर शिंदे, प्रकाश धुळा खरात, रामचंद्र हणुमंत कोळेकर,महेश सुखदेव जानकर, सर्जेराव दगडू मासाळ, सागर अजित कोळेकर, महेश जनार्धन कोळेकर, युवराज अनिल काळे, प्रशांत नवनाथ मिसाळ, बबलु ऊर्फ प्रवीण तात्या क्षीरसागर, संजय लक्ष्मण नवगिरे, पमादे नवलकिशोर सुधा, गुलाब महिबूबसाहेब खैराट, ईश्वर गणपत सरडे, सज्जन तानाजी गोरे, रवी तिम्मा बंदपट्टे, कैलास नाना माळी अशा विविध गुन्ह्यातील           फरारी आरोपींना जेरबंद करण्यात आले.

 दीड महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि त्यांच्या पथकाने शहर आणि ग्रामीण भागात फरारी आरोपींचा शोध घेऊन २२ फरारी आरोपींना जेरबंद करुन संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

 फरारी आरोपी नाव, पत्ता, ठिकाण बदलून राहतात. अनेक वर्षे फरारी असल्याने गुन्हेगारांच्या चेहºयातही अनेक बदल घडून येतात. अशावेळी फरार गुन्हेगारांना शोधणे ही मोठी समस्या असते. पोलीस अधीक्षक प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग, सोलापूर तालुका, पंढरपूर तालुका, कुर्डूवाडी, मोहोळ, माढा, पंढरपूर शहर आणि करमाळा या आठ पोलीस ठाणे हद्दीतील फरारी आरोपींना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस हवालदार अल्ताफ काझी, सचिन वाकडे, पोलीस नाईक निशांत ठोकळी, रवी माने, विजयकुमार भरले, पांडुरंग काटे यांनी केली.

५८६ समन्स वॉरंट बजावलेविविध गुन्ह्यांतील ५८६ साक्षीदार आणि आरोपी यांना एका दिवसात समन्स वॉरंट बजावण्यात आले. यात अजामीनपात्र वॉरंट ७४, जामीनपात्र वॉरंट ९५ असे एकूण १६९ तर ४१७ जणांना समन्स बजावण्यात आले.  विशेष मोहीम उघडण्यात आली होती. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सर्व पोलीस ठाण्यामार्फत ही कारवाई केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPandharpurपंढरपूर