शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारी येथील जुगार अड्ड्यावर धाड; ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 10:29 IST

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात ४ लाख २ हजार ...

ठळक मुद्दे४ लाख २ हजार ६५0 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आरोपींविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल नऊ जणांना अटक करण्यात आली

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात ४ लाख २ हजार ६५0 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी ४.४५  वाजता करण्यात आली. 

प्रकाश चंद्रशेखर कोटे (रा. मल्लिकार्जुन नगर सोलापूर ), सिद्धाण्णा बसण्णा खंटे (रा. कुंभारी, ता.दक्षिण सोलापूर), राजेंद्र राम मनगुळे (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), रमेश अमृत लिंबीतोडे (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), विजय वसंत धनशेट्टी (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), महादेव बसण्णा बिराजदार (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर), शिवशरण विठ्ठल हेबळे (रा.राजीव नगर, सोलापूर), कांतप्पा बसण्णा बिराजदार (रा.मल्लिकार्जुन नगर, सोलापूर) आदी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार आली होती. याची दखल घेत पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.  

कुंभारी गावच्या हद्दीतील भैरव टेक्स्टाईलजवळ जमादार वीटभट्टीच्या बाजूस उघड्यावर असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकण्यात आली. तेथे आरोपींच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने असा एकूण ४ लाख २ हजार ६५0 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

      ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टीममधील पोलीस सब इन्स्पेक्टर ए. एस. तांबे, डी. एस. दळवी,पोलीस कॉस्टेबल अक्षय कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकूळ, नवनाथ थिटे,उत्तरेश्वर घुले, योगेश येवले, चालक पोलीस कॉन्स्टेबल आनंद दिगे या टीमने पार पाडली. अधीक्षकांचे आवाहन- जिल्ह्यात जर कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे जुगार अड्डे व अवैध धंदे सुरू असतील तर नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, संबंधितांवर कारवाई केली जाईल असे अवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी