शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पोखरापूरच्या युवा शेतकºयाने खडकाळ जमिनीवर फुलविले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:19 IST

अशोक कांबळेमोहोळ : पोखरापूर येथील उजाड माळरानावर असणाºया खडकाळ जमिनीवर सन २०१५ मध्ये शासनाच्या जलयुक्तशिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून काढण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तलाव व ओढ्यातील पाच हजार ब्रास गाळ त्या जमिनीवर टाकला. खडकाळ जमिनीला आकार देत त्या जमिनीत वेगवेगळ्या फळांच्या अनेक झाडांची लागवड करीत तीन एकर क्षेत्रात ओडीसी जातीच्या शेवग्याच्या झाडांची ...

ठळक मुद्दे पोखरापूर येथील पुष्कराज पाटील यांची २० एकर जमीनआजमितीला एक टन शेंगा बाजारामध्ये विक्री केल्या नोकरीच्या मागे न लागता शेती उद्योगाला आधुनिकतेची जोड

अशोक कांबळेमोहोळ : पोखरापूर येथील उजाड माळरानावर असणाºया खडकाळ जमिनीवर सन २०१५ मध्ये शासनाच्या जलयुक्तशिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून काढण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तलाव व ओढ्यातील पाच हजार ब्रास गाळ त्या जमिनीवर टाकला. खडकाळ जमिनीला आकार देत त्या जमिनीत वेगवेगळ्या फळांच्या अनेक झाडांची लागवड करीत तीन एकर क्षेत्रात ओडीसी जातीच्या शेवग्याच्या झाडांची लागवड करून वर्षाला तीन एकरात १५ ते २० लाख रुपये उत्पन्न घेण्याची किमया युवा शेतकरी पुष्कराज लहुराज पाटील यांनी करून दाखविली आहे.

 पोखरापूर येथील पुष्कराज पाटील यांची २० एकर जमीन आहे. जमिनीचा काही भाग वगळता सर्वच क्षेत्र निव्वळ खडकाळ आहे. त्यामुळे ती जमीन पडीकच असायची. सन २०१५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून ओढे, नाले, पाझर तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. ती मोहीम मोहोळ तालुक्यात तत्कालीन तहसीलदार बी. आर. माळी यांनी राबविली होती. त्यावेळी पुष्कराज पाटील यांनी या योजनेचा लाभ उचलत मंडल अधिकारी बापूसाहेब सुरवसे यांच्या सहकार्याने ढोकबाभूळगाव येथील पाझर तलाव, पोखरापूर येथील पाझर तलाव व मोहोळ येथील गणपती ओढा अशा तीन ठिकाणांहून पाच हजार ब्रास गाळ लोकसहभागातून उचलून त्या २० एकर क्षेत्रात टाकला होता.

जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची लेवल करून त्या जमिनीत  रस्त्याच्या दुतर्फा बाजूस १५० नारळाची झाडे लावली असून, आंब्याच्या वेगवेगळ्या २५ जातीच्या झाडाची लागवड केली आहे. त्याचबरोबर फणस, पापनस, काजू , अंजीर, निंबोणी, सीताफळ, मोसंबी, संत्री, पेरू, जांभूळ, चिक्कू, डाळिंब या फळांच्या झाडाची लागवड केली आहे. आज या सर्वच झाडांना फळे लागू लागली आहेत.

फळांच्या झाडाबरोबरच! खडकाळ जमीन त्यात पाण्याची कमतरता लक्षात घेता गाळ टाकलेल्या या क्षेत्रात बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या पुष्कराज पाटील यांनी पाच महिन्यांपूर्वी ओडीसी जातीच्या शेवग्याच्या झाडाची तीन एकरावर लागवड केली आहे. कमी उंचीच्या या झाडाला मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगा लागतात. ड्रीपच्या माध्यमातून पाणी व सेंद्रिय खताच्या माध्यमातून जोपासलेल्या या शेवग्याच्या बागेला आता बहार आला असून शेंगा लागल्या आहेत. 

२0 लाख उत्पन्न अपेक्षितआजमितीला एक टन शेंगा बाजारामध्ये विक्री केल्या आहेत. एकरी १५ टन अशा तीन एकरात ४० ते ४५ टन शेंगा निघतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. बाजारामध्ये ४० रुपये ते ५० रुपये भाव आहे. ४० रुपयांप्रमाणे जरी भाव मिळाला तरी या तीन एकराचे वर्षाला १५ ते २० लाख रुपये उत्पन्न घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीचे झाले सोने!- ज्या उजाड माळरानावर एकेकाळी काहीही पिकत नव्हते. त्या ठिकाणी प्रशासनाने राबविलेल्या लोकसहभागातून काढण्यात आलेल्या ओढ्या नाल्याचा गाळ नेऊन आज त्या शेतीचे सोने झाले आहे. जिद्द व चिकाटी ठेवून कोणताही उद्योग केल्यास यश निश्चित मिळते.  ग्रामीण भागातील युवकांनी पारंपरिक शेती सोडून नोकरीच्या मागे न लागता शेती उद्योगाला आधुनिकतेची जोड देऊन शेती करावी, असा सल्ला पाटील यांनी दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती