शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 19:48 IST

माजी शिवसेना तालुका प्रमुखाच्या मुलाने दिला त्रास; मोहोळच्या नगरसेविकेसह दोघांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्दे लग्नास नकार देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून तरूणीने आत्महत्याशिवरत्न दीपक गायकवाड, सीमा सुभाष पाटील (दोघे रा. कुरूल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे गेल्या नऊ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते, गीतांजली ही शिक्षणासाठी सोलापुरात आली होती

सोलापूर : लग्नास नकार देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी मोहोळ येथील शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाचा मुलगा व शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

शिवरत्न दीपक गायकवाड, सीमा सुभाष पाटील (दोघे रा. कुरूल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवरत्न गायकवाड याचे गीतांजली विलास पाटील (वय २८, रा. कुरूल, ता. मोहोळ) हिच्यासोबत गेल्या नऊ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. गीतांजली ही शिक्षणासाठी सोलापुरात आली होती. पत्रकार भवन येथील वॉटर फ्रंट डी विंग फ्लॅट नं.४0१ मध्ये राहत होती. 

शिवरत्न गायकवाड याने गीतांजली हिला गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला होता. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. हा प्रकार नऊ वर्षे चालला, त्यानंतर शिवरत्न गायकवाड व सीमा पाटील यांनी संगनमत करून गीतांजली हिला लग्नास नकार दिला. त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गीतांजली हिने वॉटर फ्रंट येथील राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. तिला पोलीस नाईक वाडीकर यांनी शासकीय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी विलास मारूती पाटील (वय ५७, रा. कुरूल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

आत्महत्येपूर्वी लिहिली होती चिठ्ठीगीतांजली ही ‘लॉ’चे शिक्षण घेत होती. ती वॉटर फ्रंट डी विंग फ्लॅट नं. ४0१ मध्ये एकटी राहत होती. तिने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर गीतांजली हिच्याकडे मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीत तिने शिवरत्न याच्याशी प्रेमसंबंध होते, तो आता लग्नाला नकार देत आहे. म्हणून मी माझे आयुष्य संपवत आहे असे लिहिले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याDeathमृत्यूadvocateवकिलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट