शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

फटाके विक्रीचा यंदा ‘फुसका बार’ सोलापूर शहरातील स्टॉलची संख्या घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:46 IST

वेळेतच फटाके फोडण्याचे आदेश; ग्राहकांनी फिरवली पाठ

ठळक मुद्देफटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ शाळांमध्ये शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल थाटलेयंदा जागेअभावी स्टॉलची संख्या कमी झाली

सोलापूर : फटाक्यांबाबत एकीकडे न्यायालयाने नियम,अटी घातल्या तर दुसरीकडे स्वस्ताईने बालगोपाळांच्या चेहºयावर आनंद पसरवला आहे़ यंदा फटाक्यांचे दर १६ टक्क्यांनी खाली आले असून, फटाके स्टॉल्सची संख्याही घटली आहे. 

यंदाही सावरकर मैदान, पार्क चौक, कंबर तलाव, अक्कलकोट रोडवर महालक्ष्मी मंदिर आणि सूतमिल, होटगी रोडवर आसरा, विजापूर रोडवर मयूर मंगल कार्यालय, पुंजाल मैदान अशा अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लागले आहेत़ यंदा फटाके स्टॉलची संख्या ही ३०० असून मागीलवर्षी ही संख्या ४०० वर होती़ यंदाही फटाके तामिळनाडूतील शिवकाशी येथून दाखल झाले आहेत.

सुरुवातीला महिनाअखेर, पगारी नसल्याने फटाके खरेदीला सोलापूरकरांचा प्रतिसाद नव्हता; मात्र दोन दिवसात बोनस आणि सानुग्रह अनुदानामुळे सर्वच आस्थापना क्षेत्रातील कर्मचारी मुलांना घेऊन फटाके खरेदीसाठी बाहेर पडले़  सकाळी आणि सायंकाळी या स्टॉलवर ग्राहकांची फारसी गर्दी होताना दिसेनासे झाली आहे. लहान मुलांचा उत्साह शिगेला पोहोचला असून त्यात स्वस्ताईने भर घातली आहे़ पोलीस प्रशासन आणि महापालिकेने स्टॉलना लागणाºया सेवासुविधा आणि परवाने यंदा सहजरित्या उपलब्ध झाल्या; मात्र मोकळ्या जागांअभावी ही संख्या घटली. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ शाळांमध्ये देण्यात आले. त्यामुळे त्याचाही परिणाम यंदाच्या फटाके व्यवसायावरही झाला आहे. 

शंभर दुकाने झाली कमी...- शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल थाटले जातात़ यंदा जागेअभावी स्टॉलची संख्या कमी झाली आहे़ दरवर्षी होम मैदानावर काही दुकाने थाटली जात होती़ यंदा होम मैदानावर सुरक्षा कुंपन उभारण्याचे काम सुरू आहे़ तसेच काही विकासकामेही सुरु आहेत़ त्यामुळे यावर्षी काही ठिकाणी दुकाने थाटता आली नाहीत़ उलट मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शंभर दुकाने कमी झाली़ 

यापूर्वी जीएसटी नसताना विविध कररुपाने फटाक्यांच्यामागे ३५ टक्के रक्कम अधिक भरावी लागत होती़ जीएसटीमुळे कारभार पारदर्शी झाला आणि करात कपात झाली़ आता जीएसटी १८ टक्के असल्याने सर्वसामान्यांना यंदा फटाके स्वस्त मिळत आहेत़ - सुनील रसाळेफटाके विके्रेते

टॅग्स :SolapurसोलापूरDivaliदिवाळीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस