शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
4
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
5
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
6
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
7
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
8
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
9
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
10
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
11
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
12
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
13
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
14
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
15
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
16
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
17
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
18
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
19
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
20
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी

World high blood pressure day; ताणतणाव टाळा, पथ्ये पाळा अन् हृदयरोगाला पळवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:27 IST

जागतिक उच्च रक्तदाब दिन;  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा मौलिक सल्ला

ठळक मुद्देजगात २००० सालच्या नोंदीनुसार २६ टक्के नागरिक रक्तदाबाने ग्रस्त १४०/९० पेक्षा जास्त रक्तदाब असणे याला हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असं म्हटलं जातं.रक्तदाब असणाºया रुग्णांनी पुढील बाबी वाचून दक्षता घेणे गरजेचे

विलास जळकोटकर 

सोलापूर : धावपळीच्या जगात ताणतणावाला मूठमाती देऊन नियमित अन् वेळेवर आहार घ्या. दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक सुरळीत ठेवा. उच्च रक्तदाबासारखी भेडसावणारी समस्या यातून आपोआप नाहिशी होईल. कोणत्याही आजाराचा बाऊ न करता त्याच्याशी सलगी करून नियमित औषधोपचार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ताणतणाव आपोआप टळेल. शरीर सुदृढ ठेवण्यास मदत होईल, अशा टिप्स देताना जीवनाचा मनस्वी आनंद लुटा, असा मौलिक सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना दिला. 

जगात २००० सालच्या नोंदीनुसार २६ टक्के नागरिक रक्तदाबाने ग्रस्त आहेत. २०२५ नंतर हे प्रमाण २९ टक्क्यांवर जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्तदाब हा आजार प्रामुख्याने वयाच्या चाळिशीपासून सुरू होतो. अर्थात त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनाही तो होतो. साधारणत: चक्कर येणे, डोके दुखणे, डोळ्याला दोन प्रतिमा दिसणे, शरीराला घाम सुटणे, बेशुद्ध होणे, फीट येणे ही साधारणत: ढोबळ कारणे असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल दडके यांनी सांगितले.

याशिवाय हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे म्हणतात.. १४०/९० पेक्षा जास्त रक्तदाब असणे याला हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असं म्हटलं जातं. रक्तदाब होण्याची मुख्य कारणे म्हणजे खूप जास्त काम, चिंता, राग, जेवणामध्ये मिठाचे, तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कडक होऊन जाणाºया रक्तवाहिन्या हे असते. जास्त वजन असणे, किडनीची रक्तवाहिनी बारीक असणे हे देखील रक्तदाब होण्याची कारणे मानली जातात. 

शरीर सुदृढ ठेवायचे असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने औषधोपचाराबरोबरच आठवड्यातून किमान ५ दिवस दररोज अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे. वजन नियंत्रणात ठेवावे. आहारात जास्त मीठ वापरू नये. चरबीयुक्त तेलकट पदार्थ टाळावेत. योगा, प्राणायाम करावे, नियमित वेळेवर झोपावे अणि व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वाचकांनी उच्च रक्तदाबापासून सावधान राहण्यासाठी योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रुग्णांनो प्रथम हे लक्षात घ्या अन् अंमल करा- रक्तदाब असणाºया रुग्णांनी पुढील बाबी वाचून दक्षता घेणे गरजेचे आहे. रक्तदाब नियमित केला नाही तर हृदय आघात (हॉट अ‍ॅटॅक), किडनी फेल होणे, रक्तवाहिन्या जाड, कठीण होऊन जाणे असे आजार होऊ शकतात. रक्तदाबाचे निदान झाले असेल तर डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर नियमित घ्यावीत. वजन जास्त झालेले असेल तर आपल्या उंचीप्रमाणे वजन कमी करावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित व्यायाम करावा. आपल्या खाण्यामध्ये मिठाचे, तेलाचे प्रमाण खूप कमी करावे. मांसाहार कमी करावा. चिप्स, लोणची, पापड, सॉस, चॉकलेट, आईस्क्रीम, केक आणि कोल्ड्रिंक्स घेऊ नयेत. नेहमी ताज्या भाज्यांचा वापर करावा. केळी, संत्री, नारळाचे पाणी, रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी चांगले असते. सूर्यफुलाचे तेल किंवा सोयाबीन तेल जेवणामध्ये वापरावे. मांसाहारामध्ये मासे खाण्यास परवानगी आहे. रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या आहारात गहू, तांदूळ, राळी, मका, अंकुरीत दाळी यांचा समावेश असावा, असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे यांनी रुग्णांना दिला आहे. 

या तपासण्या करा...

  • - मूत्रपिंड विकार तपासणी
  • - शरीरातील चरबीचे प्रमाण
  • - मधुमेह तपासणी
  • - ईसीजी, थॉयरॉईडची तपासणी गरजेची
  • - तरुण रुग्णाचा रक्तदाब वाढला तर त्याची होमोसिस्टीम तपासणी करावी.
टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल