शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Women's Day Special : ट्रॅक्टरचालकांच्या सावलीसाठी राबतात रुपालीताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:45 IST

एल. डी. वाघमोडे  माळशिरस : पारंपरिक व्यवसायाचा आधार घेत नव्या संकल्पना घेऊन आधुनिकतेच्या गरजेनुसार विविध वाहनांचे सीट कव्हर्स, स्कूल ...

ठळक मुद्देआधुनिकतेच्या गरजेनुसार विविध वाहनांचे सीट कव्हर्स, स्कूल बॅगसह वेगवेगळ्या कुशन तयार करणे व विशेष करून ट्रॅक्टरची छत बनविण्यात हातखंडा निर्माण केला तो रूपाली शिंदे यांनी.पतीसोबत व्यवसायात  भरारी घेणाºया रूपाली शिंदे यांनी आतापर्यंत १००० पेक्षा जास्त छत बनविण्याचा टप्पा पूर्ण केलेला आहे.

एल. डी. वाघमोडे माळशिरस : पारंपरिक व्यवसायाचा आधार घेत नव्या संकल्पना घेऊन आधुनिकतेच्या गरजेनुसार विविध वाहनांचे सीट कव्हर्स, स्कूल बॅगसह वेगवेगळ्या कुशन तयार करणे व विशेष करून ट्रॅक्टरची छत बनविण्यात हातखंडा निर्माण केला तो रूपाली शिंदे यांनी़ पतीसोबत व्यवसायात  भरारी घेणाºया रूपाली शिंदे यांनी आतापर्यंत १००० पेक्षा जास्त छत बनविण्याचा टप्पा पूर्ण केलेला आहे. पंचक्रोशीतील हजारो ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टरवर छत मारून सावली करून घेण्यासाठी या माऊलीकडे येतात.

रूपाली शिंदे या धनंजय शिंदे यांच्याबरोबर १४ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाल्या़ यावेळी धनंजय शिंदे हे तुटपुंज्या पगारावर सहकारी संस्थेत नोकरी करीत होते़ लग्नानंतर दोघांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला़ पाच वर्षांपूर्वी या दाम्पत्याने या व्यवसायाचे कोणतेही प्रशिक्षण नसताना सुरुवात केली़ सुरुवातीला दोघे आॅर्डरप्रमाणे ट्रॅक्टर मालकांच्या घरी जाऊन त्यांना हवे तसा छत तयार करून देत असत़ पुढे पुढे या कामाने गती घेतली़ रोज दोन ते तीन छत बांधले जातात तर ऊसतोडणी हंगामापूर्वी दररोज पाच ते सहा छतांची निर्मिती केली जाते़ 

छत बांधणीत हातखंडा- छताला विविध कंपनीचे ४.५० मीटर कापड घेतले जाते़ त्यानंतर छताच्या आकारमानानुसार कापड कापणी करतो़ झुंबर, सिलिंग, लाईटिंग, नक्षीकाम, सोनेरी कलरच्या पट्ट्या व वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीनच्या साह्याने डिझाईन तयार केली जाते़ त्याला चिमट्याच्या साह्याने छताच्या सांगाड्यावर ठेवून विशिष्ट प्रकारच्या सोल्युशनने चिटकावले जाते़ त्याबरोबर आवश्यक त्या ठिकाणी दोरा व आरीच्या साह्याने शिवणकाम केले जाते़ एक छत बनवण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतोे, असे रूपाली शिंदे सांगत होत्या़

छत बांधणी अथवा अशा पद्धतीची कामे पुरुष मंडळी बºयापैकी करतात, मात्र पतींनी सुरू केलेल्या व्यवसायाला आपला हातभार लागावा, या दृष्टीने मी हा व्यवसाय सुरू केला़ आता सर्व कामे करण्याची कला मी आत्मसात केली आहे. आमच्या तत्पर व मजबूत सेवेमुळे ट्रॅक्टरच्या छत बांधणीला ग्राहक संख्या वाढत आहे़- रूपाली धनंजय शिंदे, कारागीर

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला