शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांनो व्यापाºयांचा पुळका कशासाठी ? गाळे ई निविदा समर्थनार्थ महापालिका कर्मचाºयांची एकजुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:05 IST

सोलापूर : महापालिकेच्या भाडेकरार मुदत संपलेल्या मेजर गाळ्यांचे ई निविदा पध्दतीने भाडे ठरविण्याच्या आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या प्रस्तावाला व्यापाºयांबरोबर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापूर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी एकवटले, राजकारण्यांनो तुम्हाला व्यापाºयांचा पुळका कशासाठी असा सवाल उपस्थित केल्याने वातावरण गरम झाले आहे़ई निविदेच्या समर्थनार्थ महानगरपालिका कामगार संघटना कृती ...

ठळक मुद्देअशोक जानराव यांनी नगरसेवकांच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला़आयुक्तांच्या भूमिकेमुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार नगरसेवकांनी व्यापाºयांचा पुळका आणून विरोधी भूमिका घेतली

सोलापूर : महापालिकेच्या भाडेकरार मुदत संपलेल्या मेजर गाळ्यांचे ई निविदा पध्दतीने भाडे ठरविण्याच्या आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या प्रस्तावाला व्यापाºयांबरोबर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापूर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी एकवटले, राजकारण्यांनो तुम्हाला व्यापाºयांचा पुळका कशासाठी असा सवाल उपस्थित केल्याने वातावरण गरम झाले आहे़

ई निविदेच्या समर्थनार्थ महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्यावतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती़ बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव, संघटक अजय क्षीरसागर, सरचिटणीस प्रदीप जोशी, मार्गदर्शक जर्नाधन शिंदे, कार्यकारणी सदस्य तेजस्विनी कासार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रशासकीय इमारतीसमोर जमले़ सर्वांनी आयुक्त साहेब आप आगे बढो़़़हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देऊन महापालिकेचा परिसर दणाणून सोडला़

यावेळी आयोजित सभेत संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी नगरसेवकांच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला़ आम्ही महापालिकेत कामगारांच्या बाजुने भूमिका मांडली आयुक्तांच्या भूमिकेमुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे़ यामुळे शहराची विकासकामे, ठेकेदारांची देणी, कर्मचाºयांचा थकीत पगार देता येणार आहे़ असे असताना विकासकामांसाठी निधी द्या म्हणून आयुक्तांच्या मागे तगादा लावणाºया मुठभर नगरसेवकांनी व्यापाºयांचा पुळका आणून विरोधी भूमिका घेतली आहे़ हे पुढारी जन्मले नव्हते तेव्हापासून त्यांच्या आई - वडीलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम केले आहे़ आयुक्तांच्या उत्पन्न वाढीच्या भूमिकेसाठी आम्ही पाठींबा देत आहोत़ व्यापाºयांचे लाड करणाºया नगरसेवकांनी कर्मचाºयांचा पगार झाला नाही याबाबत सभेत आवाज उठविला का असा सवाल उपस्थित केला़

यावेळी जनार्धन शिंदे, तेजस्विनी कासार, दिपक दोड्यानूर, प्रदीप जोशी, अजय क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन केले़ गाळे प्रकरणी गुडेवार यांच्यासारखी स्थिती होणार नाही आम्ही आयुक्तांच्या बाजुने आहोत अशी त्यांनी भूमिका मांडली़ ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष भोसले, छावा संघटनेचे योगेश पवार यांनीही या आंदोलनाला पाठींबा दर्शविला़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका