शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील लग्नासाठी जवळचे ५० कोण? हे ठरवताना होतेय मोठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:54 IST

आपले लग्न वाजतगाजत वरातीने व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. पण, आवाज आला तर कारवाई होईल या भीतीने वरात काढण्यात आली नाही

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये लग्न करण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त ५० जणांना परवानगी देण्याच्या नियमाने जास्त अडचण होत आहे. नेमक्या कोणत्या ५० जणांना बोलवायचे हा प्रश्न वधू-वरांच्या वडिलांना पडत आहे.

जून महिन्यामध्ये लग्नासाठी परवानगी घेण्यासाठी पोलिसांकडे जावे लागत होते. त्यानंतर ही जबाबदारी महापालिकेच्या झोन कार्यालयाकडे देण्यात आली. ५० जणांनाच परवानगी असल्याने अनेकांसमोर अडचणी आल्या. मात्र, यातूनही अनेकांनी मार्ग काढले. काहींनी लग्नाच्या आधीही जेवणाची पंगत वाढली. जेणेकरून जेवण केलेले अक्षता झाल्यावर घरी परत जाऊ शकतील. उर्वरित पाहुणे अक्षता झाल्यानंतर जेवण करून गेले.

आपले लग्न वाजतगाजत वरातीने व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. पण, आवाज आला तर कारवाई होईल या भीतीने वरात काढण्यात आली नाही. अनेकांनी परवानगी न काढताही कार्यक्रम उरकले. अंगणात किंवा घराजवळ असणाऱ्या मंगल कार्यालयात लग्नाचा कार्यक्रम घेतलेल्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले तर अनेकांनी लग्नपत्रिका प्रत्यक्ष न देता सोशल मीडियावरून दिली. या पत्रिकेत दुरूनच आशीर्वाद देण्याची विनंती करण्यात आली.

----------------

लग्नासाठी नियमावली

 

  • - ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही
  •  
  • - मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे
  •  
  • - हॅण्डवॉश, सॅनिटायजरचा वापर करणे
  •  
  • - थर्मल स्कीनिंगद्वारे प्रत्येकाची तपासणी
  •  
  • - संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तूचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे
  •  
  • - मंगल कार्यालयात एअरकंडिशनचा वापर न करता हवा खेळती राहण्यची व्यवस्था करणे

-------

परवानगीसाठी माेठी कसरत

  • -परवानगी कुणाची घ्यायची हेच बहुतांश जणांना माहिती नसते. परवानगीसाठी पालिकेच्या झोन कार्यालयात जाणे आवश्यक असताना अनेकजण पोलीस ठाणे किंवा महापालिकेत जात आहेत.
  • - सात दिवस आधी परवानगी घ्यावी लागत असल्यामुळे ऐनवेळी येणाऱ्या पाहुण्यांची यादी नोंदवावी लागते.

 

माझ्या भावाचे लग्न मोठ्या उत्सवाप्रमाणे करायचे होते. लग्न ठरल्यानंतर लॉकडाऊन आल्यामुळे खूप निर्बंध आले. फक्त ५० माणसात कार्यक्रम करावा लागला. अनेक पाहुणे मंडळी नाराज झाले. वाजत-गाजत वरात काढण्याचेही राहून गेले.

- सचिव लोंढे, वरबंधू

परवानगी कुठून घ्यायची यापासून अडचणीस सुरुवात झाली. पोलीस ठाणे, महापालिका येथे गेल्यानंतर कळले की झोन कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. लग्न सुरू असतानाही कोरोना संशयित कुणी आले तर नाही ना याची काळजी घ्यावी लागली.

- प्रकाश पाटील, वधूपिता

॰॰॰॰॰॰॰॰॰॰

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या