शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सोलापुरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तरुणाईचा कौल कोणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:24 IST

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली

ठळक मुद्देमागील तीन लोकसभा निवडणुकांत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाला किती मतदान झाले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.राहुल गांधी झोपडपट्टी, शास्त्रीनगर, इंदिरानगर, माधवनगर, कुमठा नाका, बापूजीनगर, नीलमनगर, जुने विडी घरकूल, बेडरपूल, पद्मशाली चौक या परिसरात चुरशीचे मतदान झाले

राकेश कदम

सोलापूर : मागील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा विचार करता शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारात वाढ झाली असली तरी होणाºया मतदानात किंचित घट दिसून येत आहे. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी ५५.०८ टक्के इतके मतदान झाले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत ५५.४४ टक्के इतके मतदान झाले होते. या वेळेस या मतदारसंघात पुरुष: १,३७,२१६ व महिला: १,३०,६८८ असे २,६७,९०४ इतके मतदार होते. प्रत्यक्षात पुरुष: ८०,२३५ व महिला: ६८,३०४ असे १,४८,५३९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पाच वर्षांनी या मतदारसंघात २३ हजार ७६७ मतदारांची भर पडली. या लोकसभेसाठी शहर मध्य मतदारसंघात महिला: १,४७,४३१ व पुरुष: १,४४,२३३, तृतीयपंथी: १० असे २ लाख ९१ हजार ६७४ मतदारांची यादी तयार होती. यापैकी पुरुष: ८४,७५४ व महिला: ७५,९०३ असे १ लाख ६० हजार ६५७ मतदारांनी मतदान केले. या वेळेस मतदान वाढले असले तरी एकूण मतदारांच्या तुलनेत टक्केवारी कमी येत आहे. 

शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करीत आहेत. निवडणूक प्रचारात काँग्रेस, भाजप वंचित आघाडीच्या उमेदवारांनी चुरस निर्माण केली होती. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघात श्रमिक मतदारांची संख्या मोठी आहे. वाढलेल्या मतदानात तरुणाईचा सहभाग मोठा आहे. हा कौल पाहणे हेही महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल गांधी झोपडपट्टी, शास्त्रीनगर, इंदिरानगर, माधवनगर, कुमठा नाका, बापूजीनगर, नीलमनगर, जुने विडी घरकूल, बेडरपूल, पद्मशाली चौक या परिसरात चुरशीचे मतदान झाले आहे. 

काय होता मागील कौल- मागील तीन लोकसभा निवडणुकांत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाला किती मतदान झाले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सन २०१४, भाजप: ७५,१८१, काँग्रेस: ५५,८१३, सन: २००९, भाजप: ४६,८९३, काँग्रेस: ५४,९७४, सन २००४, भाजप: ४२,७३५, काँग्रेस: ४६,१४३. या वेळेस तिरंगी लढत होत असल्याने कोण किती मते खेचणार याकडे सर्वांचे लागले आहे. आता मतदारसंघात अनेक जण कोणाला किती मते मिळतील, याचा हिशोब घालत आहेत, पण २३ मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान