शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

SP तेजस्वी सातपुतेंनी घातलं पीपीई कीट, ICU मधील कोरोनाबाधित पोलिसाचं मन केलं धीट

By appasaheb.patil | Updated: May 14, 2021 09:52 IST

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची तत्परता, पोलीस अधीक्षकांनी कर्मचाऱ्याला दिला धीर....

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक सातपुते यांनी तत्काळ त्या पोलीस अधिकाऱ्याची समजूत काढून एक प्रकारचा विश्वास देण्याच्या उद्देशाने स्वत: पीपीई कीट घालून कोरोना वाॅर्डात त्या अधिकाऱ्याची भेट घेतली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : शहरातील एका खासगी रुग्णालयातील आयसीयू (अतिदक्षता विभागात) उपचार घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या तब्येची विचारपूस करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पीपीई कीट परिधान करून त्या पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. गरज पडल्यास कुठेही नेऊन उपचार करू असा विश्वास सातपुते यांनी संबंधित सहायक पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबीयास दिला. वळसंग पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश ढाले (वय ५६) यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

उपचारासाठी प्रतिसाद देत नाहीत... उपचाराला ते कंटाळलेत... सारखं सारखं नकारात्मक बोलतात याबाबतची माहिती संबंधित डॉक्टरांनी पोलीस अधीक्षकांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक सातपुते यांनी तत्काळ त्या पोलीस अधिकाऱ्याची समजूत काढून एक प्रकारचा विश्वास देण्याच्या उद्देशाने स्वत: पीपीई कीट घालून कोरोना वाॅर्डात त्या अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

गरज पडल्यास कुठेही उपचारास नेऊसहायक पोलीस निरीक्षकावर उपचार सुरू आहेत. औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन, आदी महत्त्वाच्या आरोग्य सेवासुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना मिळत आहेत. हॉस्पिटल प्रशासनास उपचारासाठी काही अडचण आल्यास त्यांनाही ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी मदत करीत आहेत. त्यांच्यावर येथील रुग्णालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत. गरज पडल्यास मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरात उपचारासाठी दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.भेटायला येऊ...काळजी करू नका...पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सहायक पोलीस निरीक्षक ढाले यांची भेट घेऊन उपचारांबाबत विचारपूस केली. काही काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल...औषधोपचार वेळेत घ्या...सकारात्मक विचार करा...डॉक्टर जे सांगतील त्याला प्रतिसाद द्या...आम्ही तुम्हाला सारखं सारखं भेटायला येऊ अशा प्रकारचा विश्वास पोलीस अधीक्षक सातपुते यांनी ढाले यांना दिला.वळसंगचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश ढाले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी स्वत: त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. डॉक्टरांकडून उपचारांबाबत माहिती घेतली. डॉक्टरांशी बोलणे झाले. ढाले हे लवकर बरे होतील अन् पुन्हा सेवेत दाखल होतील.- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल