शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सुटका होताच ४० फुटांवर मांजात अडकलेला कावळा हवेत झेपावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:21 IST

अखेर सोलापूर महानगरपालिकेच्या बास्केट वाहनाच्या माध्यमातून सोडविले सुरक्षित

ठळक मुद्दे- मांजात अडकलेल्या कावळयाची महापालिका व अग्निशामक दलाच्या मदतीने झाली सुटका- सुरक्षित खाी येताच तेवढ्यात ताकदीने तो हवेत झेपावला

सोलापूर : ४० फूट उंचावर पिंपळाच्या झाडावर मांजामध्ये अडकलेल्या कावळ्याची अ‍ॅनिमल राहत, महापालिका आणि अग्निशामक दलाच्या मदतीने सुटका करण्यात आली़ सुरक्षित खाली येताच तेवढ्याच ताकदीने तो हवेत झेपावला़ यावेळी प्राणिमित्रांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.

सोमवारी सकाळी सम्राट चौकात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ एका पिंपळाच्या झाडावर मांजामध्ये कावळा अडकल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले़ येथील एक तरुण विशाल कांबळे याने अ‍ॅनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली़ अ‍ॅनिमल राहतचे आणखी एक सदस्य अजित मोटे आणि डॉ़ आकाश जाधव हे दोघे घटनास्थळी पोहोचले़ अ‍ॅनिमल राहत आणि अग्निशामकचे कार्यकर्ते या बास्केट गाडीत बसून कावळ्यापर्यंत पोहोचले़ अडकलेल्या मांजासह कावळ्याला खाली घेतले आणि दोरा कापून त्याला बाहेर काढले़ तो जखमी नव्हता, मात्र अत्यवस्थ होता़ अजित मोटे यांनी त्याच्यावर उपचार केले़ त्याला ऊर्जा मिळाली, पंखात बळ आले़ उपचार करणाºयांकडे पाहत त्याने हवेत झेप घेतली.

बास्केट व्हॅनची मदत...- कावळा खूपच उंचीवर फसल्याचे निदर्शनास आले़ यावेळी अ‍ॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले़ मात्र त्यांची शिडी तिथपर्यंत पोहोचत नव्हती, त्यामुळे त्याची सुटका करण्यात अडथळे येत होते़ खूप प्रयत्न करून या तरुणांनी महापालिकेच्या विद्युत विभागाचे परदेशी यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी शहरातील पथदिवे दुरुस्त करण्यासाठी वापरली जाणारी बास्केट गाडी पाठवून दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाcowगाय