शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हील चेअर,  रॅम्पची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:13 IST

सोलापूर व माढा मतदारसंघातील ३४८० मतदान केंद्रांत देणार सुविधा

ठळक मुद्देसोलापूर व माढा मतदारसंघातील ३४८० मतदान केंद्रांत देणार सुविधानिवडणुक कामात सरकारी दवाखाने, संस्थांकडून मदतीसाठी पुढाकार- दिव्यांगांना व्हील चेअर उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याच्या सूचना

सोलापूर : मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना व्हील चेअरची सुविधा निर्माण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ३ हजार ४८0 मतदान केंद्रांत ही सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी झेडपी आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्यावर  सोपविण्यात आली आहे. सरकारी दवाखाने, सेवाभावी संस्था व ग्रामपंचायतीकडून व्हिल चेअर मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून मतदान केंद्रात रॅम्पची सुविधा निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जमादार यांनी दिली. 

मतदानात दिव्यांगांचा सहभाग वाढावा, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना करण्यात आल्या आहेत. निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ही जबाबदारी पूर्ण करून घेण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून डॉ. जमादार यांची नियुक्ती केली आहे. 

मतदान केंद्राची संख्या, केंद्रातील दिव्यांग मतदारांची संख्या याबाबत माहिती जमादार यांनी निवडणूक कार्यालयाकडून मागविली आहे. ग्रामपंचायतींना पत्र पाठवून मतदानाप्रसंगी व्हील चेअरची सुविधा निर्माण करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. सेवाभावी संस्थांनाही याबाबत मदतीची अपेक्षा करण्यात येत आहे. यासाठी निवडणूक कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात येणार नाही. 

दिव्यांगासाठी आवश्यक व्हिल चेअरची संख्या व आवश्यक रॅम्प किती आवश्यक आहे याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत नियोजन करून दिव्यांगांना या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती जमादार यांनी दिली. 

सेवाभावी संस्थांची मदत ठरणार अडचणीची

  • - दिव्यांगांना व्हील चेअर उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सेवाभावी संस्थांकडून ही सुविधा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे; मात्र अनेक सेवाभावी संस्था या राजकीय अधिपत्याखालीच असल्याने व्हील चेअरचा विषय वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
  • - व्हील चेअरवर कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींचा प्रचार होणार नाही याची दक्षता निवडणूक यंत्रणेला घ्यावी लागत आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाधाsolapur-pcसोलापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग