शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलवर एका वर्षाच्या मुलीला पाहतोय अन् घरच्यांशी संवाद साधतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 13:02 IST

यूपी-बिहारमधील कामगारांच्या भावना; सोलापुरातील एमआयडीसीत शेकडो लोक अडकून

ठळक मुद्देएमआयडीसी परिसरातील कारखान्यातच सर्व कामगार थांबून आहेत बहुतांश दुकाने बंद असल्याने त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे सर्वत्र कडक संचारबंदी असल्याने मोबाईल दुकानेदेखील बंद आहेत

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : मी उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहे. मला एक वर्षाची मुलगी आहे. लॉकडाउनच्या एक महिना अगोदर गावी जाऊन मुलीचा चेहरा पाहिला होता. आता तिला फक्त व्हॉट्सअ‍ॅपवरच भेटतोय. व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलवर मुलीची हालचाल विचारतोय आणि घरच्यांशी संवाद साधतोय. अधून-मधून घरच्यांचाही फोन येतो. मुलगी, पत्नी, आई-वडील आणि भावंड सगळे हजारो किलोमीटर लांब आहेत. तर मी सोलापुरातील फॅक्टरीमध्ये अडकून आहे. घरच्यांचा फोन आला किंंवा त्यांची आठवण झाली तरी जीव कासावीस होतो. डोळ्यात अश्रू साचतात, असे परवेज शेख सांगत होते.

परवेज शेख हे उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहेत. अक्कलकोट रोड येथील एमआयडीसीत कपाट तयार करण्याच्या मंगलगिरी या फॅक्टरीत ते काम करतात. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेश तसेच बिहार, मध्य प्रदेश येथील शेकडो मजूर सोलापुरात अडकून पडले आहेत. सर्वांची अवस्था परवेजसारखीच आहे. मजुरांच्या मालकांकडून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होत आहे. काहींना त्यांची व्यवस्था त्यांनाच करावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे जीवन बिकट होत आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड प्रांतातील गरीब व होतकरू कामगार अक्कलकोट रोड एमआयडीसी तसेच चिंचोळी एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. वेल्डिंग वर्क्स, लोखंडी फर्निचर, गादी फॅक्टरी तसेच इतर काही लघु उद्योगात काम करतात. लघु उद्योजकांकडून त्यांना मोठी मागणी असते. मंगलगिरी फॅक्टरीत फिरोज अहमद, मोहम्मद कैफ, अरमान अन्सारी मशरूप अन्सारी आदी जोनपूर येथील युवा कामगार काम करतात. 

मोबाईलमध्ये बॅलन्स नाही..- एमआयडीसी परिसरातील कारखान्यातच सर्व कामगार थांबून आहेत. एमआयडीसी परिसरातील बहुतांश दुकाने बंद असल्याने त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे होत आहेत. सर्वत्र कडक संचारबंदी असल्याने मोबाईल दुकानेदेखील बंद आहेत. त्यामुळे परप्रांतीय कामगारांना मोबाईल रिचार्ज करता येईना. त्यामुळे अनेकांना त्यांच्या परिवारातील सदस्यांशी मोबाईलवर संवाद देखील साधता येईना. त्यामुळे घरच्यांकडून फोन आल्यावरच आपल्या कुटुंबाची हालचाल विचारत आहेत.

आमच्या मंगलगिरी फॅक्टरीत बाहेरच्या प्रांतातील पाच कामगार काम करतात. या पाच मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आमच्याकडून होत आहे. या लोकांना गावाकडे जाण्याची प्रचंड ओढ लागून राहिली आहे. आमच्यासारख्या इतर फॅक्टरीमध्ये सुद्धा अनेक लोक परप्रांतीय कामगार अडकून आहेत. अडकून राहिलेल्या परप्रांतीय मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून झाल्यास खूप चांगले होईल.- इस्माईल शेख, मंगलगिरी फॅक्टरी मालक 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMobileमोबाइल