शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी यात्रेत भाविकांनी काय काळजी घ्यावी; जाणून घ्या नगरपालिकेने दिलेल्या सूचना

By appasaheb.patil | Updated: June 6, 2023 20:54 IST

पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत घाण करु नये. शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा. नदीपात्रात, सार्वजनिक जागेत, अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये. 

सोलापूर : आषाढ शुद्ध एकादशी २९ जून २०२३ रोजी आहे. ह्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भरणारी आषाढी यात्रा २२ जून ते दि. ६ जुलै या कालावधीत होणार आहे. यात्रेस येणाऱ्या यात्रेकरूंनी स्वच्छतेविषयक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

भाविक, यात्रेकरूंनी हे करू नये..

पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत घाण करु नये. शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा. नदीपात्रात, सार्वजनिक जागेत, अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये.  उघड्यावर शौचविधी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदीपात्रामध्ये शौचास बसू नये किंवा नदीचे पात्र प्रदूषित होईल, असे कृत्य करणाऱ्याविरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम 115अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच नदीमध्ये वाहने, जनावरे धुणे, कचरा टाकणे असे कृत्य करु नये.

चांगल्या आरोग्यासाठी हे नक्की टाळा..

यात्रेकरुंनी नदीचे, बोअरचे पाणी पिऊ नये, नळाचेच पाणी प्यावे, नासकी, कच्ची फळे खाऊ नयेत, शिळे अन्न खाऊ नये. कचरा कचरा पेटीतच टाकावा. सार्वजनिक रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कचरा न टाकता घंटागाडीकडे द्यावा. दशमी, एकादशी व द्वादशी या दिवशी घंटागाडी सकाळी व रात्री अशी दोन वेळा निघेल, याची घरमालक, मठाधिपती व नागरिकांनी नोंद घ्यावी. शहरातील नागरिकांनी आपली जनावरे मोकाट न सोडता बांधून ठेवावीत. मोकाट जनावरे व त्यांचे मालक यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाविकांनी व भक्तांनी  झाकुन ठेवलेले व ताजे अन्नपदार्थ खावे. नदीचे पाणी पिवू नये. नगर परिषद टोल फ्री नंबर 18002331923 हा आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी