शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कशी वाटली आयडिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 3:29 PM

विषय तसा गंभीर आहे, परंतु जरा हटके मथळा दिसल्यावर वाचणारे अवाक् होऊन वाचतात म्हणूनच हा प्रपंच. गेल्या तीन-चार वर्षांपासून ...

विषय तसा गंभीर आहे, परंतु जरा हटके मथळा दिसल्यावर वाचणारे अवाक् होऊन वाचतात म्हणूनच हा प्रपंच. गेल्या तीन-चार वर्षांपासून बºयाच अंशी कोरड्या पावसाला सामोरे जावे लागले. दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या. यंदा मात्र परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावून सोलापुरी पोशिंद्याला सुखावून सोडल्याने आनंदी आनंद वातावरण आहे.

परतीच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी यंदाही दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी स्थिती आपल्याला भेडसावत होती. त्याचवेळी माझ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. माझ्या वर्गासमोर तीन-चार फुटाचं एक बाळसं धरलेलं झाड आहे. रोज संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर दुसरीच्या वर्गातली एक मुलगी त्या झाडाजवळ वॉटर बॅग रिकामी करून जायची.

चार-पाच दिवस लक्ष देऊन मी तिच्या नित्यक्रमाचा निरीक्षण करत होतो, पण तिच्या या उपक्रमात काही खंड पडला नाही. न राहवून मी तिला जवळ बोलावून विचारलं, ‘अगं बाळा! तू रोज त्या झाडाजवळ वॉटर बॅगमधील पाणी का सांडतेस गं.’ ती सहज बोलून गेली, ‘शाळेतून घरी जाईपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे. वॉटर बॅगमधील पाणी रस्त्यावर सांडले की तसंच राहतं.’ ‘हो पण त्याने काय होतंय?’ माझ्या या प्रश्नाला उत्तर देताना ती बोलली, ‘सांडलेल्या पाण्यात कुणीतरी घाण पाय ठेवलं की रस्ता खराब होतो ना! त्या झाडाजवळ माती आहे ना,  तिथे सांडल्यावर पाणी गडप होतं ना, म्हणून सांडते..’ बोलत बोलतच ती निघून गेली. या तिच्या बोलण्याचा प्रभाव मात्र माझ्या विचारांवर पडला. त्या छकुलीचे उत्तर जरी वेगळे असले तरी तिच्या आयडियाची कल्पना आपण इतर मुलांच्या डोक्यात घातली तर? मी थोडं डोकं खाजवून दुसºया दिवशी परिपाठावेळी त्या छकुलीच्या कल्पनेला आकार देण्याच्या विचारात गर्क झालो.दुसºया दिवशी परिपाठावेळी सर्व मुलांना सूचना केली, ‘आजपासून सर्व मुलांनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना बाटलीत किंवा वॉटर बॅगेत शिल्लक असलेलं पाणी आपापल्या वर्गासमोर लावलेल्या झाडाला ओता.’ मग काय अंमलबजावणी त्याच दिवसापासून सुरूही झाली.

सुरुवातीला एक-दोन, नंतर तीन्-चार आणि मग पुढे सर्वच मुले शाळा सुटल्यानंतर वॉटर बॅगमधील, बाटलीतील राहिलेले पाणी आपापल्या वर्गासमोर लावलेल्या झाडाला ओतून जाऊ लागली. सुकलेली, हिरमुसलेली रोपटी तग धरून राहिली, काही दिवसांनंतर त्या झाडांची दोन-चार फुटांनी उंचीही वाढलेली दिसून आली. मग काय मुलांमध्ये आणखी हुरूप आला व त्यांनी आपले कार्य जोमातच चालू ठेवले. काही दिवसांनी शाळेत चाललेली चिमुकल्यांची ही लुडबुड त्या छकुलीच्या लक्षात आली. कदाचित तिच्या लक्षात आलं असावं की, ‘आपल्याला सरांनी झाडाला पाणी ओतताना पाहिलं, काहीबाही विचारलं व इतरांनाही पाणी ओतायला लावलं. पण हे सारं माझ्यामुळेच घडलं ! ‘म्हणून की काय एकदा ती आपल्या मैत्रिणीला सहज म्हटली, ‘कशी वाटली आयडिया!’ आणि नेमकं हे मला ऐकायला आलं, पण मित्रहो तिची ही कल्पना मला तर आवडली हं! तुम्हालाही आवडेलच नक्की.. विचार काय करताय ‘राबवा तुम्हीही!’ मुलांनी आरंभलेला हा नवा अध्याय त्यांच्यासाठी मजेची बाब आहे, परंतु आपल्यासारख्या लोकांसाठी  परिवर्तनाची नांदी आहे.- आनंद घोडके(लेखक झेडपी शाळेत शिक्षक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरIdeaआयडिया