शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विमानतळाला अडथळा ठरणाºया सिध्देश्वर साखर कारखान्याच्या पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय झाले? जिल्हाधिकाºयांकडून सिद्धेश्वर कारखान्याला विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 11:22 IST

चिमणीचे पाडकाम करताना दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय उपाययोजना केल्या, याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कुमठे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिले आहेत.

ठळक मुद्देहोटगी रोडवरील विमानतळावरून विमान उड्डाणास अडथळा ठरणारी चिमणी हटविण्याचे आदेशवाळू प्रकरणात कारवाईसाठी गेल्यानंतर ट्रक जाळल्याच्या आरोपावरून करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांच्यावर कर्जत (जि. अहमदनगर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसहा महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून चिमणीच्या पाडकामाची तयारी झाल्यानंतर कारखान्याने पर्यायी चिमणी उभारण्याचे आश्वासन प्रशासनाला दिले होते

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : चिमणीचे पाडकाम करताना दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय उपाययोजना केल्या, याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कुमठे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिले आहेत.होटगी रोडवरील विमानतळावरून विमान उड्डाणास अडथळा ठरणारी चिमणी हटविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने कारखान्याला दिले होते. यासंदर्भात सिद्धेश्वर साखर कारखाना कामगार युनियनने दाखल केलेल्या याचिकेवर जून २०१८ मध्ये सुनावणी होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून चिमणीच्या पाडकामाची तयारी झाल्यानंतर कारखान्याने पर्यायी चिमणी उभारण्याचे आश्वासन प्रशासनाला दिले होते. यावर प्रशासनाने पर्यायी चिमणी उभारण्याच्या कामावर आमचे लक्ष असेल. पर्यायी चिमणीची जागा विमानतळ विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार निश्चित करावी, असे सांगितल होते. याबाबत न्यायालयीन लढाई सुरू असली तरी पर्यायी चिमणी उभारण्याचे काय झाले, याबाबत खुलासा करण्याचे पत्र सिद्धेश्वर कारखान्याला दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. न्यायालयाने काही निर्देश दिले असतील तर आदेश पाहूनच पुढील कार्यवाही ठरविता येईल. परंतु, तूर्तास कारखान्याला खुलासा करण्यास सांगितल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. ----------------------करमाळा तहसीलदारांच्या चौकशीचे पत्र पाठवले- वाळू प्रकरणात कारवाईसाठी गेल्यानंतर ट्रक जाळल्याच्या आरोपावरून करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांच्यावर कर्जत (जि. अहमदनगर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पवार यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी तहसीलदार पवार यांच्याबाबत शासनाकडे पत्र पाठविल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. ------------------खनिजच्या तक्रारी अपर जिल्हाधिकाºयांकडे करा- मुरूम, दगड, वाळू यासह विविध प्रकारच्या खनिजांचा बेकायदेशीर उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी यांच्याकडे नेहमीच येतात. परंतु यासंदर्भातील तक्रारी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडेच कराव्यात. अपर जिल्हाधिकाºयांकडून तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय