शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचे करायचे काय ? तोडगा निघणे कठीणच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:21 IST

शेतकºयांपुढे प्रश्न: वारंवार होणाºया आंदोलनातून पदरात काहीच पडेना

ठळक मुद्देदुधाचे नुकसान सोसले तरीही दर वाढवून मिळण्याची खात्री नाहीशेतकºयांनी दूधच विकू नये, अशी  शेतकरी संघटनेची भूमिकाशेतीमालाची नासाडी झाली व संस्थांनी दूध संकलन बंद केल्याने शेतकºयांचे नुकसान

सोलापूर: मागील वर्षी दूध खरेदी बंद आंदोलनातून शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही उलट दुधाचा दर कमीच झाल्याने शेतकºयांचे नुकसानच झाले. आता पुन्हा शेतकरी संघटनेचे सोमवारपासून दूध बंद आंदोलन सुरू होणार असल्याने दुधाचे करायचे काय?, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.

राज्यात शेतीमाल (फळे, पालेभाज्या, फळभाज्या) व  दुधाचे दर घसरल्याने मागील वर्षी राज्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. १ जून ते ६ जून २०१७ या कालावधीत शेतीमाल व दूध वाहतूक विरोधात आंदोलन झाले होते. त्यानंतर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये जाहीर केला; मात्र त्याची कोणीही अंमलबजावणी केली नाही.

आंदोलनाच्या आठवडाभराच्या कालावधीत शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीमालाची नासाडी झाली व संस्थांनी दूध संकलन बंद केल्याने शेतकºयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर दुग्धविकास मंत्र्यांनी जाहीर केलेली दूध दरवाढ तर शेतकºयांना मिळालीच नाही, उलट मागील वर्षभरात गाईच्या दुधाचा खरेदी दर ८ रुपयाने कमी झाला आहे. जून २०१७ या महिन्यात गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये होता तो यावर्षीच्या जून-जुलै महिन्यात १७ रुपयांवर आला आहे. 

आता शेतकºयांनी दूधच विकू नये, अशी  शेतकरी संघटनेची भूमिका आहे. प्रतिलिटर थेट शेतकºयांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करावे किंवा संस्थांनी दर वाढवून द्यावा, या शेतकरी संघटनेच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत दुधाचे करायचे काय?, असा शेतकºयांचा प्रश्न आहे. काही दिवस दुधाचे नुकसान सोसले तरीही दर वाढवून मिळण्याची खात्री नाही.

तोडगा निघणे कठीणच?- दूध दरवाढीसाठी आंदोलन होणार असल्याने थेट शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर अनुदान जमा करावे,  यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. राज्यात सहकारी संघाकडून ३५ टक्के व खासगी संघ व गवळ्यामार्फत ६५ टक्के दूध संकलित होत असल्याने दूध उत्पादक शेतकºयांची यादी नसल्याचे कारण सांगितले जाते असे परिचारक म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाStrikeसंपRaju Shettyराजू शेट्टी