शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल... ओक्के मदी सगळं; शहाजीबापूंच्या ‘डोंगार’मुळे माणदेशी बोली जगभर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 08:33 IST

शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं.

रवींद्र देशमुख -

सोलापूर: अहो, चर्चा तर होणारच! सांगोल्याच्या शहाजीबापूंनी जणू गुवाहाटीचं ‘डोंगार’च सर केलंय... माणदेशसारख्या कोरड्या भागातून आलेेल्या या शिवसेनेच्या रांगड्या आमदारानं आपल्या माणबोलीतून आसामची हिरवाई जगभर पोहोचवली... यानिमित्ताने ‘गदिमा’, व्यंकटेश माडगूळकर या दिग्गज लेखकांनी अक्षरवैभव दिलेल्या माणदेशी भाषेची चर्चा सुरू झाली. नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमातील आर्ची ठसक्यात म्हणाली होती ना..‘मराठीत कळत नाय, तर इंग्लिशमध्ये सांगू का?’ ही करमाळा भागातील भाषा देशभर पोहोचली; पण शहाजीबापूंनी तर माणबोली जगभर पोहोचवली.शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं. त्यांच्या त्या संवादाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे जसा माणदेशी रांगडेपणा उमजला तसं बंडामागचं खरं खरं कारणही मराठी जनतेला उमजलं. जशी ही ऑडिओ क्लिप जगभर गेली, तसे शहाजीबापूही गाजले.सोशल मीडियावर जिकडे पाहावे तिकडे ‘काय झाडं, काय डोंगार...‘ओके’मध्ये आहे’ हे त्यांच्या संवादाचं पहिलं वाक्य अनेकांच्या वॉलवर झळकू लागलं. अनेक यू-ट्यूबर पत्रकारांनी बापूंच्या या ऑडिओमधील कन्टेन्टचा आधार घेऊन सध्याच्या राजकारणाचं विश्लेषण करणारे व्हिडिओ केेले. हजारोंच्या संख्येने लाईक्स अन् व्ह्यूज या व्हिडिओंना मिळत आहेत.शहाजीबापू ज्या भागातून आलेत तो माणदेश हा सातारा, सांगली अन् सोलापूर जिल्ह्यातील माण नदीच्या खोऱ्याचा प्रदेश. पाण्याअभावी आलेला कोरडेपणा येथील माणसांच्या स्वभावात व भाषेवरही दिसून येतो. माणदेशी बोली जितकी रांगडी तितकीच आपुलकीची अन् प्रांजळ... 

तिथली रम्यता भावली असेल!ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा इंगोले यांनी शहाजीबापू पाटील यांच्या संवादातील भाषा अन् भाव याबाबत ‘लोकमत’शी बोलताना विवेचन केले. ते म्हणाले की, आमदारांचं अवघं आयुष्य माणदेशातील कोरड्या प्रदेशात गेलं. त्यांना तिथले डोंगर, झाडे आणि एकूणच रम्यता भावली. त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यातून आले. इथल्या भूप्रदेशाचा, वातावरणाचा परिणामही माणसाच्या वागण्या-बोलण्यात आलेला आहे. त्यामुळे भाषेचा लहेजा वेगळा वाटतो. माणदेशी बोलीभाषा इथल्या ग्रामीण महिलांमध्ये अधिक जाणवते. ‘वरलीकडून आला’, ‘खाललीकडं गेला’ अशी बोली सर्रास ऐकायला मिळते. माणदेशी बोलीवर सध्या संशोधन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाषेचा गौरव झाला!सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे शहाजीबापूंच्या बोलीची प्रशंसा केली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’मुळे करमाळा, जेऊरची भाषा देशभर पोहोचली. बापूंच्या मोबाईलवरील संवादामुळे बऱ्याच काळानंतर आमच्या भाषेला उजळणी मिळाली..या निमित्ताने सोलापुरी भाषेला गौरव प्राप्त झाला आहे, असे गायकवाड यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेhotelहॉटेल