शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सौभाग्याचं लेणं सावकाराकडे गहाण ठेवून विडी कामगार हाकताहेत संसाराचा गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:27 IST

सराफांकडेही दिली जातेय मोड : पोटाला चिमटे देऊन काढले लॉकडाऊनचे दिवस

ठळक मुद्देमहिला गुपचूपपणे आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून व्याजदरात कर्ज काढताहेतलॉकडाऊनमुळे यंत्रमाग कामगार असलेला नवरा सुद्धा घरातच बसून आहेअडीच महिन्यांपासून एक रुपयाची कमाई नाही. मग घर चालणार कसं ?

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून विडी कारखाने बंद आहेत. यामुळे महिला विडी कामगारांची रोजीरोटी बुडाली. कामगार पोटाला चिमटे देत दिवस ढकलताहेत. त्यांची आर्थिक विवंचना थांबता थांबेना. उद्योग सुरू करायला शासनाकडून परवानगी मिळाली. पण प्रशासकीय नियमावलीच्या अडचणीमुळे विडी कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे कामगारांनी धास्ती घेतली आहे. हातावर पोट असणाºया या कामगारांच्या घरी चुली पेटेनात. त्यामुळे खाजगी सावकारांपुढे ते हात पसरवतायेत. तर बहुतांश महिला आपलं सौभाग्याचं लेणं (मंगळसूत्र) गहाण ठेवून संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करताहेत.

पाच जूनपासून सराफ दुकाने झाली आहेत. सराफ दुकानांसमोर काही महिलांची गर्दी दिसते. या महिला गुपचूपपणे आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून व्याजदरात कर्ज काढताहेत. तर काही महिला कामगार आपले इतर दागिने मोडताहेत. अशोक चौक येथील रहिवासी असलेल्या पार्वतीअम्मा बँक आॅफ इंडिया समोरील एका सराफ दुकानात शनिवारी दुपारी बराच वेळ बसून होत्या. तेथे येण्याचे कारण त्यांना विचारले असता त्यांनी घरची परिस्थिती कथन केली. त्यांना तीन मुली आहेत. 

लॉकडाऊनमुळे यंत्रमाग कामगार असलेला नवरा सुद्धा घरातच बसून आहे. अडीच महिन्यांपासून एक रुपयाची कमाई नाही. मग घर चालणार कसं ?. घरात असलेला एकमेव दागिना अर्थात त्यांचं सौभाग्याचं लेणं मणी मंगळसूत्र ते गहाण ठेवायला दुकानात आल्याचे त्यांच्या बोलण्यावरूनच कळाले. त्या दुकानात बसलेल्या होत्या. त्यांना त्यांचा फोटो काढू का ?असे विचारले असता त्यांनी हात जोडून नकार दिला. पूर्वभागात अशा अनेक पार्वतीअम्मांच्या व्यथा चव्हाट्यावर येत आहेत. लवकरात लवकर कारखाने सुरू होऊन त्यांच्या चुली पेटतील , अशी आशा हजारो महिला कामगार बाळगून आहेत. कारखाने काही सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे त्याच्या समोर अंधार पसरला आहे. 

पोटाची खळगी भरता येईना...- साईबाबा चौकातील महिला विडी कामगार वसुंधरा दामोदर येथे सांगतात, त्यांना चार मुली आहेत. त्यांना स्वत:चं घर नाही. ते भाड्याच्या खोलीत राहतात. लॉकडाऊनमुळे पोटाची खळगी भरता येईना. तिथे घर भाडे कुठून आणू दे. घरचा गाडा हाकण्यासाठी महिन्याकाठी पाच हजार रुपये लागतात. विडी कारखान्याकडून फक्त हजार रुपये अनामत रक्कम मिळाले. त्यामुळे पोटाला चिमटे देण्याशिवाय पर्याय राहत नाही. काही दिवस चुल पेटवली नाही. यापूर्वी घरच्या अडचणीमुळे कर्ज काढले. ते खर्च फेडता येईना. आता पुन्हा कर्ज काढण्याची स्थिती आमच्यावर उद्भवली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याGoldसोनंjobनोकरी