शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

चारनंतर अचानक हवामान बदललं, वादळी वावटळासह सोलापूर जिल्ह्यात पाऊस

By appasaheb.patil | Updated: June 4, 2023 19:45 IST

वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

सोलापूर : बळीराजाला प्रतीक्षा असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने अखेर रविवारी सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली. गत काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा सोसणाऱ्या सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दुपारी चारनंतर हवामानात अचानक बदल झाला.. वारे जोरात वाहू लागले अन् सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून शहरासह जिल्ह्याला वाढलेल्या तापमानानं हैराण केले होते. उकाड्याने व वाढलेल्या तापमानाच्या पारामुळे सोलापूर हैराण झाले होते. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४१ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. हे तापमान मागील पंधरा दिवसांतील कमीच होते. रविवारी दुपारी चारनंतर वारे जोरात वाहू लागले. याचवेळी ग्रामीण भागात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा जाणवत होता. पाचनंतर ढगांच्या प्रभावामुळे वातावरण हलके ढगाळ होते. त्यानंतर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत रिमझिम पाऊस पडला. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. हवामान खात्यानुसार, विदर्भात आता पूर्व मोसमी पावसाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता..भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. आकाश ढगाळ, गडगडाटासोबत विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शिवाय सोसाट्याचा वाराही मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचेही सांगितले आहे.

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूर