शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी पथक कागदावरच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:32 IST

साखर कारखान्यांच्या वजनकाट्यासंदर्भात सातत्याने संशयाने पाहिले जात असून, कारखाने संशयाच्या भोवºयात सापडले जात असल्याने साखर आयुक्तांनी वजनकाटे तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्याबाबत दिलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्षित केले आहेत.

ठळक मुद्देदीड महिना उलटला तरी वजनकाटे तपासणीला सुरुवातही झालेली नाही.साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी पथक तयार करण्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले साखर कारखान्यांची संख्या पाहता दोन पथकांची आवश्यकताआम्ही पुढील आठवड्यापासून वजनकाटे तपासणी करणार : शिवाजी बागल

राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी पथक कागदावरच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्षअरुण बारसकरसोलापूर दि १३ :  साखर कारखान्यांच्या वजनकाट्यासंदर्भात सातत्याने संशयाने पाहिले जात असून, कारखाने संशयाच्या भोवºयात सापडले जात असल्याने साखर आयुक्तांनी वजनकाटे तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्याबाबत दिलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्षित केले आहेत. साखर हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला तरी वजनकाटे तपासणीला सुरुवातही झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा विषय पुढे आला होता. एक नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू होणार असल्याने साखर आयुक्त कार्यालयाने मंत्री समितीच्या बैठकीनंतर ७ आॅक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना एक पत्र दिले होते. या पत्रात साखर कारखाने वजनकाटे मारत असल्याच्या तक्रारी विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांकडून येत असतात, असे नमूद केले आहे. या तक्रारीनुसार कार्यवाही करण्यासाठी आपल्या स्तरावर भरारी पथक नेमण्यात यावे, असे म्हटले होते. या भरारी पथकात वैधमापन शास्त्र विभाग, महसूल, पोलीस, प्रादेशिक सहसंचालक (साखर) व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, असे म्हटले होते. एखाद्या कारखान्याच्या वजनकाट्याच्या गैरप्रकाराबाबत तक्रार आल्यास त्याची चौकशी करुन तत्काळ कारवाई करण्याबाबत साखर आयुक्तांच्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तर कारखाने सुरू होऊन दीड महिना लोटला तरीही वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकांची नियुक्ती झाली नाही. ---------------------- तर तपासणीची दिशा कशी ठरणार..राज्यातील शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांच्या तक्रारी पाहता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर साखर आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकेच तयार केली नसल्याने सोलापूर जिल्ह्यात वजनकाटे तपासणीला प्रारंभही झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ३९ साखर कारखाने असून, ३० कारखान्यांनी गाळपही सुरू केले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात मोठी साखर कारखानदारी असताना वजनकाटे तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.-------------------------शेतकºयांकडूनच वजनकाट्याबाबत तक्रारी येत असल्याने शासकीय वजनकाटे बसविण्याची आमची मागणी आहे. ती पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वजनकाटे तपासणीसाठी पथके तयार करण्याबाबत सूचना असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. ही बाब गंभीर असून, मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणू.- प्रभाकर देशमुख, जनहित शेतकरी संघटना-----------------------साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी पथक तयार करण्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले आहे. त्यांच्या आदेशाची वाट पाहतोय. साखर कारखान्यांची संख्या पाहता दोन पथकांची आवश्यकता आहे. पथकांचे काहीही होवो, आम्ही पुढील आठवड्यापासून वजनकाटे तपासणी करणार आहोत.- शिवाजी बागल सहायक नियंत्रक, वैधमापन

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने