शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही छोटा राजनला फरफटत आणला, हे कोण राजन लागून गेले;  राम शिंदे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:41 IST

ज्यांनी मतदारांची दिशाभूल करून मतदारसंघाचे वाटोळे केले त्यांचे दिवस आता जवळ आलेत, असा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.

ठळक मुद्देविजयराज डोंगरेच्या प्रवेशाने तालुका गुलामगिरीतून बाहेर आला - सुभाष देशमुखबाबासाहेबांचे नाव घेऊन घटना तुडवणारी ही औलाद आहे - सुभाष देशमुखविजयराज नावाचं नवीन खोंड आता मालकाच्या पायाला कासरा बांधून त्याला चौकापर्यंत ओढत आणल्याशिवाय राहणार नाही - शहाजी पवार

मोहोळ : हे मोदींचे सरकार आहे. दडपशाहीची भाषा चालणार नाही. छोटा राजनला फरफटत तिहारमध्ये आणला.. किस झाड की पत्ती, ह्याचे काय.. ..हा कोण राजन लागून गेला, अशी टीका जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केली.

भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारानिमित्त मोहोळ येथे भाजप-शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री सुभाष देशमुख होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, नागनाथ क्षीरसागर ,स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष पाटील ,विधानसभा निवडणूकप्रमुख संजय क्षीरसागर, भाजपचे तालुका अध्यक्ष सतीश काळे, विजयराज डोंगरे, शिवानंद पाटील उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या दावणीला अनगरने बांधलेला बैल खंगून जायचा. त्याची सुटका होत नसायची, परंतु विजयराज नावाचं नवीन खोंड आता मालकाच्या पायाला कासरा बांधून त्याला चौकापर्यंत ओढत आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यांनी दिला . 

मोहोळ तालुका गुलामगिरीतून बाहेर- सुभाष देशमुख म्हणाले, विजयराज डोंगरेच्या प्रवेशाने तालुका गुलामगिरीतून बाहेर आला आहे. बाबासाहेबांचे नाव घेऊन घटना तुडवणारी ही औलाद आहे. अनगरमध्ये देवाघरी गेलेले लोकसुद्धा प्रामाणिकपणे मतदानाला येतात. जिवंत मतदारांबाबत मी माहिती घेतली आहे. आत जाणारा मतदार फक्त अधिकाºयासमोर जाऊन हाताला शाई लावून माघारी येतो. बटन दाबायला तिथे वेगळीच माणसं असतात. परंतु या वेळेस ही पद्धत बंद करून तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. ज्यांनी मतदारांची दिशाभूल करून मतदारसंघाचे वाटोळे केले त्यांचे दिवस आता जवळ आलेत, असा इशारा देशमुख यांनी दिला.

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरRam Shindeप्रा. राम शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक