शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

coronavirus; इथं कामाअभावी उपाशी राहतोय; आमच्या गावाला जाऊ द्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:25 IST

पुणे-सोलापूर महामार्ग : सोलापूरच्या सीमेवर अडविल्यानंतर कामगारांची कळवळून विनंती

ठळक मुद्देकोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व दळणवळण सुविधा थांबल्या रोजीरोटी कमवण्यासाठी मोठ्या शहरात गेलेल्या कामगारांचे मोठे हाल कामगार आता आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत़

रुपेश हेळवे

सोलापूर : ‘साहेब काम मिळाले नाही तर घरी उपाशी राहतो, पण यापुढे कुठे बाहेरगावी कमवायला मात्र जाणार नाही़ आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या साहेब’, अशी हात जोडून विनवणी कामानिमित्त बाहेर गेलेले कामगार सोलापूरच्या बॉर्डरवर तपासणीसाठी थांबलेल्या अधिकाºयांना करत होते़ सोलापुरात जिल्हाबंदी केल्यामुळे सोलापूरच्या सर्व बॉर्डर सील करण्यात आल्या आहेत़ यामुळे बाहेरून सोलापुरात येणाºया कामगारांना अडवून त्यांना जिल्ह्याच्या बॉर्डरवरच राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे़ यामुळे कसेही करून आपल्या मूळ गावी जाण्याचा प्रयत्न करणाºया कामगारांची मात्र मोठी अडचण होत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व दळणवळण सुविधा थांबल्या आहेत़ यामुळे रोजीरोटी कमवण्यासाठी मोठ्या शहरात गेलेल्या कामगारांचे मोठे हाल होत आहेत़ यामुळे हे कामगार आता आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत़ ज्यांच्याकडे दुचाकी आहेत ते दुचाकीवरून रात्रंदिवस प्रवास करुन आपले घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत़ पण ज्यांच्याकडे वाहन नाही ते मात्र आता गेल्या तीन-चार दिवसांपासून पायीच प्रवास करत आहेत़ असेच मूळ उस्मानाबाद येथील, पण कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्या राठोड कुटुंबीयांना कोणतीही गाडी मिळाली नाही़ म्हणून ते शुक्रवारी सकाळी मुंबई येथून सोलापूरकडे पायी निघाले.

ते सोमवारी सकाळच्या सुमारास इंदापूरजवळ पोहोचले़ तीन दिवस ‘दिवस-रात्र’ चालत राहिल्यामुळे एका लहान मुलाला त्रास होऊ लागला़ यामुळे एका दुचाकीस्वाराला विनवणी करून लहान मुलगा आणि वडील हे गाडीवर बसून पुढे निघाले़ पण चालत जाणारे कुटुंबातील सदस्य हे मात्र मागेच राहिले़ त्या दोघांनी सोलापूर हद्दीत प्रवेश केला, पण त्यांची पत्नी आणि इतर सदस्य हे मागेच राहिले़ ते जेव्हा इंदापूरजवळील टोलनाक्यापुढे आले तेव्हा त्यांना तेथील अधिकाºयांनी अडवले आणि त्यांना पुढे पाठविण्यास नकार देत त्यांची राहण्याची व्यवस्था जवळच्या एका सभागृहात करण्यात आल्याचे सांगितले़ पण मुलगा पुढे गेला आहे, हे सांगूनही राठोड यांच्या पत्नीला पुढे पाठविले नाही, यामुळे त्यांना रडू कोसळले आणि त्या तेथील अधिकाºयांना हात जोडत विनवणी करत म्हणाल्या, ‘साहेब काम मिळाले नाही तर घरी उपाशी राहतो, पण यापुढे कुठे बाहेरगावी कमवायला मात्र जाणार नाही़ आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या साहेब’़ यानंतर मात्र तेथील अधिकाºयांनी आपल्या वरिष्ठांना विचारून पुढील निर्णय घेऊ असे सांगितले़ गेल्या तीन-चार दिवसांपासून पायी प्रवास केल्यामुळे अनेकांना अशक्तपणाचा त्रास झाला़ तर काही कामगार हे चालता चालताच अनेकवेळा चक्कर येऊन पडत आहेत़ असे चालत जाणाºयांपैकी अनेक कामगारांनी आपले अनुभव सांगितले.

नाहीतर जीवाचे बरेवाईट करून घेईन... - आपल्या पती आणि मुलापासून ताटातूट झाल्यानंतर एकटी पडलेली महिला ही मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ झाली होती. पण अधिकाºयांनी त्यांना अडवून पुढे जाता येणार नाही असे सांगितले तेव्हा ती त्या अधिकाºयांना म्हणाली, मला माझ्या मुलाला भेटायचे आहे. जर त्याला भेटण्यापासून तुम्ही रोखलात तर मी येथेच जीवाचे बरेवाईट करून घेईऩ यानंतर मात्र तेथील अधिकाºयाने वरिष्ठांना विचारु न पुढचा निर्णय घेऊ असे सांगितले़ 

सहानुभूतीशिवाय काही मिळेना...- ज्यांना रोज काम केल्याशिवाय आपल्या पोटाची खळगी भरत नाही अशा कामगारांना सध्या उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे़ यामुळे अनेक कुटुंब हे पुणे, मुंबई येथून चालतच प्रवास करत आहेत़ अनेक कुटुंबांमध्ये लहान मुले आहेत़ बहुतांश लोकांकडे जेवणाची व्यवस्था तर नाहीच यामुळे मार्गावर जे काही मिळेल ते खात पुढे जात आहेत़ पायी जाणाºया कुटुंबामध्ये तीन ते चार वर्षांची मुलेही सोबत घेऊन ते अनवाणी प्रवास करत आहेत़ सकाळ असो वा दुपार असो ते अनवाणीच असा प्रवास सुरू ठेवत आहेत़ ज्या उन्हामध्ये आपण विनाचप्पल थांबण्याचा विचार करणार नाही तसल्या रखरखत्या उन्हामध्ये मात्र ही तीन ते चार वर्षांची मुले विनाचप्पल चालत जात आहेत़ ही परिस्थिती एका कुटुंबाची नाही तर अशा अनेक कुटुंबांची आहे़ लहान मुले भरदुपारी उन्हाचा मारा सहन करत अनवाणी चालत जाताना पाहून अनेक जण सहानुभूती दाखवून पुढे जातात़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस