शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Intarview; लोकसभा निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम : राजेंद्र भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 18:30 IST

संतोष आचलारे सोलापूर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जानेवारी  महिन्यातील अंतिम यादीनुसार सोलापूर व माढा या दोन्ही ...

ठळक मुद्देमागील लोकसभा निवडणूकीत नवमतदारांचा मतदानाचा टक्का कमी होतानव मतदारांचा मतदानाच्या सहभाग वाढविण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात आली

संतोष आचलारेसोलापूर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जानेवारी  महिन्यातील अंतिम यादीनुसार सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघात तब्बल ३३ लाख ४४ हजार ५८५ मतदार आहेत. मतदान कशा पध्दतीने होणार, यात नवीन काय प्रणाली सुरू झाली याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची ही बोलकी उत्तरे !

प्रश्न : लोकसभा निवडणुकीची तयारी कितपत झाली आहे?उत्तर : लोकसभा निवडणूकीसाठी मतदान घेण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघासाठी ३ हजार ५४0 मतदान केंद्र असतील. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे तीस हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान घेण्यासाठी आम्ही पुर्ण सक्षम आहोत.

प्रश्न : सोशल मीडियावरील प्रचारावर नियंत्रण कसे असणार?उत्तर : सोशल मिडीयावर करण्यात येणाºया प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मीडिया नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. आचारसंहितेचा भंग करणारे मजकूर आढळल्यास त्याविरुद्ध संबंधितावर कारवाई करण्यात येईल. परवानगी विना प्रचार करणाºया मजकुराचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येईल. फ्लेक्स, पत्रके आदी माध्यमातून करण्यात येणाºया प्रचार साहित्यांची तपासणी करण्यासाठीही विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. 

प्रश्न : मतदानासाठी किती कर्मचारी नेमण्यात आले आहेत ? उत्तर : लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया घेण्यासाठी सुमारे तीस हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाºयास कामाबाबत पूर्ण प्रशिक्षण देण्यात आला आहे. राष्ट्रीय मोहिमेच्या कर्तव्यात असताना, त्यांनाही मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी त्यांना आॅनलाईन पोस्टल मतदान पत्रिका देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

युवा मतदारांसाठी विशेष मोहीमनव मतदारांचा मतदानाच्या सहभाग वाढविण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात आली. यामुळे नवमतदारांचा आत्मविश्वास वाढेल.  लोकशाही बळकट करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. महाविदयालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. यात ३२ हजार मतदारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

महिलांचे एक केंद्र असणारया लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात मतदान अधिकारी पासून ते शिपाई पर्यंत फक्त महिलांच मतदान घेण्यासाठी या केंद्रात असणार आहेत. असा उपक्रम या पहिल्यांदाच होत आहे. मतदानाच्या पाच दिवस आधी  मतदान स्लीप देण्यात येणार आहे.  यामुळे उपस्थिती कळणार   आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक