शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जाता जाता वायचळ म्हणाले झेडपी सभेचा तो निर्णय धोकादायक; काय आहे तो निर्णय जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 09:13 IST

ग्रामपंचायतीत गटविकास अधिकाºयाचे अधिकार काढल्यास वाढेल भ्रष्टाचार !

सोलापूर : ग्रामपंचायतीची कामे तपासण्याचा गटविकास अधिकाºयाचा अधिकार काढू नका, अन्यथा भ्रष्टाचार वाढेल अशी भीती जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी गुरूवारी येथे बोलताना व्यक्त केली.

जिल्हा परिषद प्रशासनातर्फे नूतन सीईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत तर मावळते सीईओ प्रकाश वायचळ यांच्या निरोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी झेडपीचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे होते तर याप्रसंगी समाजकल्याण सभापती संगीता धांडोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, मुख्य लेखाधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, उप शिक्षणाधिकारी सुधा साळुंके उपस्थित होते.नूतन सीईओ स्वामी यांनी प्रामाणिक व निष्ठेने काम करा, त्याचे चांगले फळ मिळते असे सांगितले. झेडपी सभेत विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी ग्रामपंचायतीच्या कामात बीडीओ टक्केवारी मागतात असा आरोप करीत अधिकार काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार सभेने ठराव केला आहे. निरोपप्रसंगी सत्काराला उत्तर देताना वायचळ यांनी या मुद्दाकडे लक्ष वेधले. ग्रामसेवक, सरपंच संघटनांनी याला विरोध केला आहे. तत्कालीन सीईओ केंद्रेकर यांनी भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी हे परिपत्रक काढले. हे परिपत्रक मागे घेतले तर भ्रष्टाचार आणखी वाढेल, त्यामुळे हा ठराव सभेत परत पाठवावा अशी सूचना केली.

कोरोनाकाळातील कामाचे कौतुक

कोरोना साथीच्या काळात कर्मचारी व अधिकाºयांनी केलेल्या चांगल्या कामाचे वायचळ यांनी कौतुक केले. अतिरिक्त कार्यकारी अधिक़ारी गुंडे सुरूवातीला घाबरले पण नंतर भीती गेल्यानंतर त्यांनी चांगले काम केले. स्वीय सहायक अविनाश गोडसे, मल्लिकार्जुन तलवार, शिपाई तम्मेवार, आयटी विभागाचे राऊत, प्रशासन विभागाचे जगताप यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. आरोग्याच्या खरेदीबाबत सदस्यांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी चौकशी व्हायलाच पाहिजे असे सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदfraudधोकेबाजी