शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पाच दिवस नव्हे सहा दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:03 IST

महापालिकेकडून वीज गायब झाल्याचे कारण; ऐन सदासदीत नागरिकांची तारांबळ

ठळक मुद्देशहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून येत आहेमहापालिकेतील पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेतऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नागरिक नाराजी

सोलापूर  :  शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसात धो-धो पाऊस कोसळत आहे; मात्र महापालिका नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. उजनी पंपगृहातील बिघाडामुळे शहरात पाच दिवसाआड पाणी सुरू होते. आता पुन्हा गुरुवारी वीज गायब झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात सहा दिवसाआड पाणी येणार आहे. 

टाकळी पंपगृहाला होणारा विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला खंडित झाला. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे टाकळी आणि सोरेगाव योजनेत पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार नाही. शुक्रवारी आणि शनिवारी शहरात कमी दाबाने पाणी येणार आहे.

मागील आठवड्यात उजनी पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण देऊन चार दिवसांऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. पाच दिवसांचे आवर्तन अद्याप पूर्ण होत नाही तोच आता टाकळी योजनेतील वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण दिले जात आहे. या बिघाडामुळे आणखी एक दिवस पाणी उशिरा येणार आहे. शहरात सहा दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी वीज वितरण कंपनीकडे बोट दाखवित आहेत. वीज वितरण कंपनी सुरळीत वीजपुरवठा करीत नाहीत. बिघाड दुरुस्त करायला उशीर लावतात, असा आरोपही हे अधिकारी करीत आहेत. 

अधिकाºयांचा कानाडोळा- शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून येत आहे. महापालिकेतील पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे या तक्रारींकडे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. उन्हाळ्याच्या सुुरुवातीला शहरात व्यवस्थित चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. पण ऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater transportजलवाहतूकwater shortageपाणीकपात