शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूरातील पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 15:02 IST

सोलापूर : बुधवारी व गुरूवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयाने सोरेगाव व टाकळी येथील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी शहर आणि हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या समस्येमुळे शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी सोलापूर परिसरात वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. वाºयामुळे वीज वाहिन्यात अनेक ठिकाणी ...

ठळक मुद्देसोलापूर परिसरात वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यासोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पंप बंद पडले

सोलापूर : बुधवारी व गुरूवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयाने सोरेगाव व टाकळी येथील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी शहर आणि हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या समस्येमुळे शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. 

बुधवारी सायंकाळी सोलापूर परिसरात वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. वाºयामुळे वीज वाहिन्यात अनेक ठिकाणी बिघाड झाले. गुरुवारी पहाटे दीड ते साडेतीन वाजता एक पंप अचानकपणे बंद पडला. त्यानंतर या केंद्राला वीज मंडळाकडून वीजपुरवठा होणाºया ३३ केव्ही वाहिनीच्या केबलचे जंप तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पहाटे ४.३५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पंप बंद पडले.

गुरुवारी दुपारी १.५0 वा. टाकळी उपसा केंद्राला वीजपुरवठा करणाºया मंद्रुप १३ मैल या दरम्यानच्या ३३ केव्ही वाहिनीचे केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी साडेतीन वाजता दुरुस्तीनंतर ही वाहिनी सुरू झाली. वीज वाहिन्यातील या तीन बिघाडामुळे १९ एप्रिल रोजी टाकळी व सोरेगाव केंद्रातून पाणी उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे गुरुवारी शहर आणि हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या तांत्रिक अडचणीमुळे गुरुवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात आता शुक्रवारी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी ज्या भागात पाणी सोडण्याचे नियोजन होते त्या भागाला शनिवारी आणि शनिवारी नियोजन असलेल्या भागाला रविवारी पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे...- गुरुवारच्या या तांत्रिक बिघाडामुळे रविवारपर्यंत शहर व हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे गेला आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी केले आहे. आगामी चार दिवस शहरात सर्वत्र पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी वेळ होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीmahavitaranमहावितरण