शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोलापूर जिल्ह्यातील पाणीपातळी सव्वादोन मीटरने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:10 IST

अरुण बारसकरसोलापूर: जिल्ह्यात यावर्षी सरासरी ४०. ७१ टक्के इतकाच पाऊस पडला असल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी २.२८ मीटरने खाली गेली आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयाने आॅक्टोबरमधील पाणी पातळीच्या मोजणीत पातळी ६.७० मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले असून, पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.जिल्ह्यातील १५६ निरीक्षण विहिरींंची पाणीपातळी वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामार्फत ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील १०० गावांतील खरीप पिकांच्या परिस्थितीचा अंदाज घेतलापर्जन्यमान घटल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खोलवर गेलीउजनी धरण वगळता अन्य तलावांतील पाणीसाठे शून्यावर

अरुण बारसकरसोलापूर: जिल्ह्यात यावर्षी सरासरी ४०. ७१ टक्के इतकाच पाऊस पडला असल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी २.२८ मीटरने खाली गेली आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयाने आॅक्टोबरमधील पाणी पातळीच्या मोजणीत पातळी ६.७० मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले असून, पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.

जिल्ह्यातील १५६ निरीक्षण विहिरींंची पाणीपातळी वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामार्फत मोजणी केली जाते. वर्षातून जानेवारी, मार्च, मे व आॅक्टोबर असे चार वेळा पाणीपातळी मोजून त्याचा अहवाल शासनाला सादर केला जातो. यावरच पाणी नियोजन केले जाते. मे महिन्यात पाऊस पडण्याअगोदर व आॅक्टोबरमध्ये पाऊस पडल्यानंतर मोजणी केलेली पाणीपातळी महत्त्वाची समजली जाते. यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने वरिष्ठ भू- वैज्ञानिक कार्यालयाच्या पाणीपातळी अहवालावर प्रशासनाला पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीचा विचार केला असता  सरासरीआॅक्टोबर महिन्यात ४.४२ मीटर पाणीपातळी होती. यावर्षीची आॅक्टोबर महिन्यात निरीक्षण विहिरींची पाणीपातळी ६.७० मीटर खाली गेली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेचा विचार केला असता यावर्षी २.२८ मीटरने पाणीपातळी खोलवर गेली आहे.

बार्शी तालुक्यात ६१ टक्के, माळशिरस तालुक्यात ४८ टक्के, दक्षिण तालुक्यात ४२ टक्के, सांगोला व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी ४१ टक्के, मोहोळ तालुक्यात ४० टक्के, उत्तर सोलापूर तालुक्यात ३९ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ३७ टक्के, अक्कलकोट तालुक्यात ३६ टक्के, माढा तालुक्यात ३२ तर करमाळा तालुक्यात २८ टक्के पाऊस पडला आहे. 

सर्वच तालुक्यांची पाणीपातळी वजा- मागील वर्षी आॅक्टोबर महिन्याची पाणीपातळी वरती (अधिक) आली होती. यावर्षी मात्र सर्वच तालुक्यांची पाणीपातळी वजा झाली आहे. २०१७ मध्ये(जून ते सप्टेंबर) ४८८.८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होता, प्रत्यक्षात ४१५.३ मि.मी. तर ८५ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना १९९.०२ मि.मी. म्हणजे ४०.७१ मि.मी. पाऊस पडला आहे.

यावर्षी पर्जन्यमान घटल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सरासरी ४० टक्के पाऊस पडल्याची नोंद असली तरी अनेक भागात यापेक्षा कमी पाऊस पडला आहे. आमचा अहवाल जिल्हाधिकारी व वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे.- मुश्ताक शेख, वरिष्ठ भू-वैज्ञानिक सोलापूर 

उजनी धरण वगळता अन्य तलावांतील पाणीसाठे शून्यावर आहेत. लहान-मोठे तलावही कोरडे आहेत. आता पशुधन जगविणे व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. उजनी धरण भरले असले तरी सर्वांना पाणी मिळेल याची दक्षता घेण्याची गरज आहे.- राजन पाटील, माजी आमदार, सोलापूर 

जिल्ह्यातील १०० गावांतील खरीप पिकांच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आहे. या १०० गावांतील पिकांची परिस्थिती आॅनलाईन भरण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक उद्या(रविवारी) करणार आहेत. - बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Solapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती