शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तमध्ये नियम शिथिलचे अधिकार जिल्हाधिकाºयांना, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची सोलापूरात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 11:30 IST

जलयुक्त शिवार अंतर्गत नियमात न बसणाºया परंतु आवश्यक असलेल्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना आहेत

ठळक मुद्देकामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना मागणी व गरज असलेल्या गावांचा जलयुक्तमध्ये समावेश नसला तरी अशा गावात नियमित योजनेतून कामे घेता येतीलदेवेंद्र फडणवीस यांनी  १४ खात्यांचे एकत्रीकरण करून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानातून झालेल्या कामामुळे गावेच्या गावे जलमय झाली. जुने रुंद असलेले ओढे झाडाझुडपांनी व्यापले होते. अशा प्रकारच्या ओढ्याचे रुं

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७  : जलयुक्त शिवार अंतर्गत नियमात न बसणाºया परंतु आवश्यक असलेल्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांना आहेत, पाणी अडविण्याची कामे घेण्याची मागणी व गरज असलेल्या गावांचा जलयुक्तमध्ये समावेश नसला तरी अशा गावात नियमित योजनेतून कामे घेता येतील असे राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.उत्तर सोलापूर तालुक्यातील जलयुक्तच्या कामाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ते बोलत होते. राज्यात मागील काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची गरज निर्माण झाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  १४ खात्यांचे एकत्रीकरण करून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानातून झालेल्या कामामुळे गावेच्या गावे जलमय झाली. जुने रुंद असलेले ओढे झाडाझुडपांनी व्यापले होते. अशा प्रकारच्या ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण झाले. अनेक ठिकाणी बंधाºयांची कामे झाली. कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कंपार्टमेंट बंडिंगची कामे झाली. याचा परिणाम शिवारात पडलेले पाणी शिवारातच अडण्यामध्ये झाला. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वरती आल्याने राज्यभरातून या कामांना मागणी वाढली असल्याचे जलसंधारण मंत्री शिंदे यांनी सांगितले. जलयुक्तमध्ये किंवा जलयुक्तमध्ये समावेश नसलेल्या गावात सिमेंट बंधारा व पाणी अडविण्याची कामे करण्यासाठी नियमावली असली तरी दोन बंधाºयातील अंतरासाठी किंवा अन्य कामासाठी तांत्रिक अडचणीमुळे कामे मंजूर होत नसतील परंतु अशी कामे होणे गरजेचे वाटत असेल तर ती मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. जलयुक्तमध्ये एखादे गाव नसेल तरीही आवश्यक असलेल्या गावात कामे नियमित योजनेतून करण्यात येतील असेही जलसंधारण मंत्र्यांनी सांगितले.-------------कामामुळे झालेल्या बदलाचा अहवाल...जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामामुळे अनेक गावात आजही पाणी वाहताना दिसत आहे. जे ओढे बंद होते ते वाहते झाले आहेत. यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने अशा ठिकाणी शेती पिकांचे वाढलेले उत्पन्न व झालेल्या बदलाच्या परिणामाचे अहवाल तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे जलसंधारण मंत्री शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRam Shindeप्रा. राम शिंदे