शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

सोलापूर शहरात हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:53 IST

वादळामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाण्याचा उपसा मंदावल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. 

ठळक मुद्देचार दिवसानंतरही वेळेवर व पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांची ओरड सुरू पाणीपुरवठा विभागातील अडचणी ओळखून झोन अधिकारी बदलण्याच्या हालचाली सुरू

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात निर्माण झालेल्या वादळामुळे शहर पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वादळामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाण्याचा उपसा मंदावल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. 

शनिवार व रविवारी माढा तालुक्यात वादळी वाºयाने वीजपुरवठ्यात व्यत्यय आला. यामुळे उजनी जलवाहिनीवरील पाणी उपसा मंदावला. हीच परिस्थिती टाकळी योजनेवर निर्माण झाली आहे. शनिवारी टाकळी पंपहाऊसजवळ जलवाहिनी फुटली. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. साडेतीन तास दुरुस्तीला लागले. त्यानंतर पंप सुरू करण्यात आले. उजनी व टाकळी जलवाहिनीवर गेल्या दोन दिवसात वारंवार ताण आल्याने शहराला होणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणावर बसला असल्याची तक्रार नगरसेवक अविनाश पाटील, विनायक विटकर यांनी केली आहे. टाक्या पूर्णपणे भरल्यानंतर पुरेसा दाब मिळेल अशा रितीने पाणीपुरवठ्याचे नियोजन व्हावे. पाणी उशिराने आले तरी चालेल पण पुरेसा दाब असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

उन्हाच्या कडाक्यामुळे वितरणाला पाणी जादा लागत आहे. अशात उजनीतून सोडलेले पाणी औज बंधाºयात येण्यास विलंब झाल्याने पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडले. आणखी आठवडाभर चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला. उजनी व चिंचपूर बंधारे भरल्यानंतर वेळापत्रक पूर्ववत करण्याची तयारी सुरू असतानाच वादळाचा फटका बसला आहे. उपलब्ध पाण्यातून शहर आणि हद्दवाढ भागाचे नियोजन करताना अडचणी वाढल्या आहेत. 

इकडे चार दिवसानंतरही वेळेवर व पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांची ओरड सुरू आहे. 

अधिकाºयांच्या बदल्या- पाणीपुरवठा विभागातील अडचणी ओळखून झोन अधिकारी बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. यापूर्वी पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या अधिकाºयांना पुन्हा या विभागात घेतले जाणार आहे. पाणीपुरवठा विभागात वितरणाची माहिती नसलेले अधिकारी कार्यरत असल्याने समस्या निर्माण झाल्याने तातडीने हा बदल करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याचा अनुभव असलेल्या अधिकाºयांचा सोमवारी शोध सुरू होता. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणी