शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; ‘उजनी’चे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचले; एप्रिल, मे महिन्यांची चिंता मिटली

By appasaheb.patil | Updated: March 28, 2023 14:36 IST

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले. ऐन उन्हाळ्यात औज बंधाऱ्यात पाणी आल्याने शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सध्या तरी उद्भवणार नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. औज परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यासंदर्भात आयुक्तांनी विजयपूर व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला होता, त्यानुसार पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सोलापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून औज धरणासाठी पाणी सोडले होते. ते पाणी सोमवारी औजमध्ये पोहोचले. एकीकडे शहरात सहा-सहा दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे. उजनी धरणातून सोलापूरपर्यंत पाणी येईपर्यंत ६७ पाणीपुरवठा योजना आहेत, या योजनांतही ते पाणी जात असल्याचेही सांगण्यात आले. या पाण्यामुळे पाणीटंचाई मिटणार असून, सुरळीत व मुबलक होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उजनीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे, त्यामुळे मेनंतर सोलापुरात पाणीटंचाई भासणार असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ujine Damउजनी धरण