शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लक

By admin | Updated: March 16, 2017 18:30 IST

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लक

आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लकविजयपूर : जिल्ह्यातील आलमट्टी धरण कृष्णा नदीवरील १२३ टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असलेल्या व मागील वर्षाच्या पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या जलाशयात सध्या केवळ १७ टीएमसी इतकाच मृतवत पाण्याचा साठा असल्याने यावर्षी बागलकोट, विजापूर, गुलबर्गा या जिल्ह्यांना अभूतपूर्व अशा तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन विजयपूर पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.आलमट्टी जलाशयाची उंची ५०६ मीटर इतकी आहे. वास्तविक पाहता आलमट्टी जलाशयातील पाणीसाठा मे महिन्यामध्ये मृतवत साठ्यापर्यंत जातो. पावसाचा अभाव, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन, जमिनीत मुरणारे पाणी, विविध प्रकारच्या पिकासाठी जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याचा वापर व आलमट्टी जलशयातून शेजारच्या राज्यात सोडण्यात आलेले पाणी आदी कारणामुळे आलमट्टी जलाशयातील पाणीसाठा मार्चच्या पंधरवड्यात मृतवत अवस्थेत गेलेला आहे. सध्या आलमट्टी जलाशयात केवळ १७ टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या असलेला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी परेसा आहे. परंतु, जलसिंचनासाठी आता पाणी सोडता येणार नसल्याचे कृष्णाभाग्य जलनियम लि. च्या एका अभियंत्याने सांगितले. आलमट्टीजलाशयांमध्ये जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा आहे. मात्र भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचे गणित कोलमडत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.-----------------------------------------------                                                                                                                 विजयपुरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीविजयपुर शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. सध्या काही भागात पाच दिवसाआड आणि काही भागात सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे विजयपुर शहरवासियांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हेस्कॉमकडून भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात येत असल्याने खोदाई करताना जलवाहिन्यांची मोडतोड होत आहे. विजयपुर शहरातील प्रत्येक रस्त्यावर गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र काही भागात पंधरा ते वीस दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. फुटलेल्या जलवाहिनीद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.