शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पाण्याची बोंबाबोंब; सर्वपक्षीय नेते एकत्र येणार, मोठे जनआंदोलन उभारणार

By appasaheb.patil | Updated: March 6, 2023 14:40 IST

शहरात तब्बल २५ दिवस चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : सोलापूर शहर व हद्दवाढ भागात २५ दिवस उलटून गेले तरी देखील सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत नाहीत. पाण्याचा खेळखंडोबा सुरूच आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मोठं आंदोलन उभा करण्याचा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही मागील आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

पाणी द्या.. पाणी द्या.. नाहीतर खुर्च्या. खाली करा.. या विविध घोषणा देत महापालिका आयुक्त कार्यालयासमोर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून माठ फोडलं होते. शहरात तब्बल २५ दिवस चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु २५ दिवस उलटून गेले तरी पालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात खेळखंडोबा सुरूच आहे. यामुळे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी पुन्हा जन आंदोलन छेडण्याची तयारी दर्शविली आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील भवानी पेठ व जोडभावी पेठ या परिसरात चार दिवसानंतर ही पाचव्या दिवशीही पाणी उशीरा  पुरवठा तेही अंत्यंत कमी दाबाने होत आहे, अशी परिस्थिती असताना आयुक्त , संबंधित अधिकारी व खातेप्रमुख मोबाईल व्दारे फोन केलं असता ते फोन उचलत नाहीत. पाणी पुरवठा तेही सुरळीत करत नाहीत. उच्च दाबानेही पाणी पुरवठा करीत नाहीत अश्या संबंधित अधिकाऱ्यांना व खातेप्रमुख यांना बडतर्फ करा, मानधनावर काम करणारं खातेप्रमुखांना सेवेतुन कमी करा, शासनाकडून सक्षम अधिकाऱ्यांची नेमणुक करा, अन्यथा प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त यांच्या विरोधात शासनाकडे आयुक्त हटाव ही मोहीम जन आंदोलनव्दारे छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी