शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील शेकडो तृतीयपंथियांना दिले मतदान कार्ड; आता हक्काची घरेही मिळणार

By appasaheb.patil | Updated: September 22, 2022 18:02 IST

उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांचे आवाहन

सोलापूर : तृतीयपंथियांना समाजात वावरण्यासाठी शासन सर्व सोयी-सुविधा देत आहे. त्यांच्या विकासासाठी विविध शासकीय योजना आणल्या आहेत. यामुळे तृतीयपंथियांनी आजारापणात, वृद्धापकाळात उपयोगी पडण्यासाठी पैशांच्या बचतीची सवय लावून घेण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी आज केले. 

रंगभवन येथे जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा एडस नियंत्रण कार्यालय, महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी आणि निरामय आरोग्यधाम संस्थेच्या वतीने आयोजित तृतीयपंथीय आणि वंचित महिलांच्या स्नेहमेळावा, विविध दाखले वाटप कार्यक्रमात श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी, तहसीलदार अमरदीप वाकडे, निरामयच्या प्रकल्प संचालिका सीमा किणीकर, ॲड. लक्ष्मण मारडकर, एडस सोसायटीचे कार्यक्रम अधिकारी नागेश गंजी, विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक मल्लिनाथ शहाबादे, दोस्ताना संघटनेचे आयुब सय्यद, सौंदर्या उपस्थित होते. 

वाघमारे यांनी सांगितले की, नागरिकांनी तृतीयपंथियाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. तेही एक व्यक्ती आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. तृतीयपंथियांनी उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, ओळखपत्र, रेशनकार्ड याबाबत पाठपुरावा करावा. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सतत पाठपुरावा केल्याने केवळ स्वयंघोषणापत्र दिल्यास तृतीयपंथीय असल्याचे युनिक ओळखपत्र मिळत आहे. जिल्ह्यात २१५ तृतीयपंथियांना मतदान कार्ड देण्यात आले आहे. उर्वरित तृतीयपंथियांनाही शिबीराद्वारे दाखले दिले जातील. कोणत्याही बाबतीत त्यांना वंचित ठेवले जाणार नाही, मात्र त्यांनी पुढे येऊन माहिती घ्यावी. त्यांच्या घराच्या भूखंडासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. 

टॅग्स :SolapurसोलापूरVotingमतदानElectionनिवडणूक