सोलापूर : महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच शुक्रवारी मतदारांना पैसेवाटप केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हैदराबाद रोड विडी घरकूल परिसरातील रेणुकानगरमध्ये (प्रभाग क्रमांक ११) भरारी पथकाने केलेल्या कारवाईत २३०० रुपयांसह शिवसेनेची प्रचारपत्रके जप्त करण्यात आली़ या प्रभागात माजी महापौर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे हे सेनेचे उमेदवार आहेत़ भरारी पथकाची यंदाच्या निवडणुकीतील ही पहिलीच कारवाई आहे़ पथकाचे प्रमुख अशोक नागनाथ डोळसे यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
मतदारांना पैसेवाटप
By admin | Updated: February 18, 2017 04:05 IST