शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भाविकाविना विठ्ठल मंदिर; उत्पन्न बंद, मात्र महिन्याला सव्वा कोटी रुपये खर्च...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:24 IST

विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला लॉकडाऊनचा फटका; अधिकारी कामावर, कर्मचाºयांना सुट्टी

ठळक मुद्देमंदिर समितीला देणगी, फोटो व लाडू विक्री, पूजा अन्य विविध मार्गाने मिळणारे उत्पन्न बंद महिन्याला सव्वा कोटीच्या आसपास खर्च मंदिर समितीला करावे लागत आहेतइच्छुक भाविकांनी मंदिर समितीला आॅनलाईन देणगी द्यावी, असे आवाहन

सचिन कांबळे 

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये पावणे तीनशेच्या आसपास कर्मचारी काम करतात. कोरोनामुळे यापैकी २७ कर्मचारी सध्या कामावर असून उर्वरित कर्मचाºयांना सुट्टी देण्यात आली आहे. अधिकारी मात्र रोज नित्यनियमाने कामावर येतात. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी, महिन्याला सव्वा कोटी रूपयांचा खर्च सुरू असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

कोरोना संसर्गजन्य रोगामुळे १७ मार्चपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. असे असले तरी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देवाचे नित्योपचार केले जातात. मंदिर समितीकडून शहरातील बेघर, भिक्षाकरी लोकांना अन्नदान केले जात आहे. यामुळे मंदिरात पुजारी व सुरक्षा कर्मचारी असे फक्त २७ कर्मचारी कामावर येतात. हे काम व्यवस्थितरित्या पार पडते का नाही याची पाहणी करण्यासाठी मंदिरात रोज कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड येतात. मंदिर बंद असल्यामुळे भाविकांकडून देणगी मिळत नाही. त्यामुळे मंदिर समितीचे उत्पन्न बंद झाले आहे. मात्र, मंदिरात काम करणाºया २३७ कर्मचाºयांना मंदिर समितीला महिन्याला ३७ लाख रुपयांचा खर्च करावा लागतो.

त्याचबरोबर रोज दीड हजार लोकांना दोनवेळा जेवण द्यावे लागत आहे. याचादेखील खर्च रोज अंदाजे २५ हजारांच्या आसपास आहे. त्याचबरोबर शहराच्या सुरक्षेसाठी मंदिर समितीने खासगी कमांडो देखील पोलीस प्रशासनाला मदतीसाठी दिले आहेत. याचादेखील वेतनाचा भार पडत आहे. यामुळे मंदिर समितीला अंदाजे महिन्याला सव्वा कोटीच्या आसपास खर्च आहे मात्र उत्पन्न सध्या शून्य आहे.

आॅनलाईन देणगी द्यावी- विठ्ठल मंदिरात भाविकांची आवक नाही. यामुळे मंदिर समितीला देणगी, फोटो व लाडू विक्री, पूजा अन्य विविध मार्गाने मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. मात्र, महिन्याला सव्वा कोटीच्या आसपास खर्च मंदिर समितीला करावे लागत आहेत. यामुळे इच्छुक भाविकांनी मंदिर समितीला आॅनलाईन देणगी द्यावी, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले.

महाराष्टÑातील इतर देवस्थानपेक्षा पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अधिक भाविक येतात. मात्र देवस्थानच्या तुलनेने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला उत्पन्न कमी असते. मंदिर बंद झाल्यापासून मंदिराच्या पेटीमध्ये  एकही पैसा आला नाही. परंतु आॅनलाईनच्या माध्यमातून मंदिर समितीला १ लाख ८० हजार रुपये देणगी मिळाली आहे. लॉकडाऊनच्या आदी मंदिराच्या विकासासाठी भाविकांनी दान म्हणून जे पैसे दिले होते. त्याच पैशांतून मुख्यमंत्री साहाय्यता निधी, बेघर लोकांना अन्नदान, जनावरांना चारा, डॉक्टरांना मेडिकल किट्स व अन्य प्रकारे मदत करत आहोत.- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकरसहअध्यक्ष, मंदिर समिती, पंढरपूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर